...आणि बाबासाहेब पुरंदरेंची माहिती ऐकून राज ठाकरे भारावले!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेर (Babasaheb Purandare) यांच्या आठवणी नाशिककरांनी जागविल्या
Raj Thakrey with late Babasaheb Purandare
Raj Thakrey with late Babasaheb PurandareSarkarnama

नाशिक : ज्येष्ठ इतिहास संशोधक, पद्मविभुषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Late Shivshahir Babasaheb Purandare) यांचा नाशिकशी विशेष जिव्हाळा होता. त्यांना २००८ मध्ये पुलोत्सव जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Suprimo Raj Thakre) यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या (कै) बाळासाहेब ठाकरे इतिहासकालीन शश्त्र संग्रहालयाचे उद्घाटन श्री पुरंदरे यांनी केले होते.

Raj Thakrey with late Babasaheb Purandare
आम्ही आदिवासी, शरद पवार हे आमचे सेनापती!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुढाकाराने उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शश्त्र संग्रहालयाचे लोकार्पण शिवशाहीर पुरंदरे यांच्या हस्ते झाले होते. याेवळी संग्रहालयाची माहिती घेताना राज ठाकरे यांनी त्यांना शिवकालीन शस्त्र कक्षात नेल्यावर त्या सर्व शस्त्रांची माहिती बाबासाहेबांना मुखोद्गत होती. त्यांनी ती सर्व माहिती दिल्यावर ठाकरे देखील प्रभावीत झाले होते. बाबासाहेबांचा नाशिकशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कुसुमाग्रज स्मारकात साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान व शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची ग्रंथतुला करण्यात आली. बाबासाहेब पुरंदरे यांनी २०१७ साली नाशिकमध्ये शेवटची भेट ठरली.

Raj Thakrey with late Babasaheb Purandare
शरद पवार म्हणाले, `मी सर्व मदत करतो, आधी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे रहा`

त्यानंतर पुरंदरे पुन्हा नाशिकमध्ये येऊ शकले नाहीत. अभ्यासू व्यक्तिमत्व, ऐतिहासिक कागदपत्रांचे जाणकार, साधी सोपी आणि तितकीच प्रभावी भाषा शैली, उत्कृष्ट लेखक, त्याचबरोबर ऐतिहासिक शस्त्रांचे जाणकार आणि तेवढाच बुलंद आवाज या सगळ्या कलागुणांच्या आधारावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास नाशिककरांच्या मनामनात जिवंत केला.

शस्त्रांची दिली माहिती

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नाशिक शहराशी फार जवळचे संबंध होते नाशिक जिल्ह्यातील गड किल्ले अभ्यासण्यासाठी आणि त्याच बरोबर नाशिक शहरातील अनेक ऐतिहासिक कार्यक्रम, प्रदर्शनांसाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नाशिक मध्ये नेहमी येत जात असायचे. 2017 साली नाशिक मधील गंगापूर रोड येथील बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी बाबासाहेब पुरंदरे आले असता संग्रहालयातील अनेक जुन्या तलवारी, भाले, बरच्या झाल, कुऱ्हाडी, बंदुका यांची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित जनसमुदायाला सांगत त्या सर्व शस्त्रांची माहिती देत असतानाच या शस्त्रांचा वापर कसा कुठे आणि कोणत्या कामासाठी केला जात होता याचीही परिपूर्ण माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली होती.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नाशिक येथे नेहमीच येणे-जाणे असायचे जाणता राजा हे त्यांच्या गाजलेल्या नाटकाचे अनेक प्रयोग ही नाशिक मध्ये झाले होते त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरे यांनी नाशिक येथील अनेक गड-किल्ल्यांना भेटी देऊन त्या गडकिल्ल्यांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला. किल्ल्यातील वैशिष्ट्य समाजासमोर मांडण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्वतः समोर आलेत.

...

बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला. आपले संपूर्ण आयुष्यभर त्यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात त्यांनी व्याख्याने दिली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ इतिहासकार महाराष्ट्राने गमावला आहे.

- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com