MNS: आता अमित ठाकरे निघणार महासंपर्क अभियान दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना बळकट करण्यावर भर दिला असून त्यासाठी हा दौरा होत आहे.
Amit Thakrey
Amit ThakreySarkarnama

नाशिक : राज्यातील (Maharashtra) राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) संघटना बळकटीवर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thakrey) यांचा महासंपर्क अभियानातील तिसरा टप्पा नाशिकमध्ये या आठवड्यात होत आहे. (Amit Thakrey will on nashik visit on the base of NMC election)

Amit Thakrey
कोश्‍यारी यांनी मराठी माणसाचा अवमान केला!

जून महिन्याच्या अखेरपासून राज्यातील राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. सत्तांतर होण्याबरोबरच आमदारांची एक संख्या असलेल्या मनसेला महत्त्व प्राप्त झाले आहे. एक आमदार असतानाही मनसेला शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे सरकारविरोधात निकाल दिल्यास एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना कुठल्या ना कुठल्या पक्षात सहभागी व्हावे लागणार आहे. त्या अनुषंगाने मनसेचे महत्त्व वाढले आहे. राज्यात जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुका होत आहेत.

Amit Thakrey
Dhule: नव्या सरकारकडून धुळे शहराच्या विकासाला गती

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला यानिमित्त बूस्टर डोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटना बळकटीकडे लक्ष दिले जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात विद्यार्थिदशेपासून झाली. एकेकाळी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून शिवसेनेने तरुणांची मोठी फळी निर्माण केली होती. त्याचप्रमाणे मनसेची वाटचाल सुरू आहे. अमित ठाकरे यांच्याकडे विद्यार्थी सेनेची जबाबदारी दिली आहे.

राज्यभर दौरे करून विद्यार्थी संघटना बळकट करण्याचे काम ते करीत आहेत. नाशिक मनसेचा बालेकिल्ला. त्यामुळे नाशिकमध्ये विद्यार्थी संघटना बळकट करण्यासाठी अमित यांचा महासंपर्क अभियानाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात महाविद्यालयांमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना मनसे विद्यार्थी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहनही करणार आहेत. यासंदर्भात मागील आठवड्यात मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर व समन्वयक सचिन भोसले यांच्याशी मुंबईत चर्चा झाल्यानंतर दौरा निश्चित करण्यात आला.

...असा आहे दौरा

- ६ ऑगस्ट : इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका

- ७ ऑगस्ट : निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड

- ८ ऑगस्ट : सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसूल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर

- ९ ऑगस्ट : नाशिक शहर, पूर्व नाशिक, मध्य नाशिक, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in