Nashik MNS News: पदाचा राजीनामा देत दातीर म्हणाले, जन्मभर मनसैनिकच राहीन!

Dilip Datir Send a Resignation To Raj Thackeray: माजी नगरसेवक दिलीप दातीर यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेतच राहणार असल्याचे सांगितले.
Dilip Datir
Dilip DatirSarkarnama

Nashik News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कळविले. हा राजीनामा त्यांनी थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल त्यांनी राज ठाकरे यांचे ऋण व्यक्त केले. (Deelip datir said resigne due to some personal resons)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) (MNS) शहराध्यक्ष दिलीप दातीर (Deelip Datir) यांची गतवर्षी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तडकाफडकी शहरप्रमुखपदाचा राजीनामा (Nashik) दिल्याने पक्षात खळबळ माजली आहे. वैयक्तिक कारणाने आपण पदावरून पायउतार होत असलो तरी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पक्षासोबत आजीवन निष्ठा ठेवणार असल्याचे दातीर यांनी सांगितले.

Dilip Datir
Sinnar APMC News: महाविकास आघाडीपुढे भाजपची अस्तित्वासाठी धडपड!

नाशिक महापालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून दातीर यांनी गतकाळात लौकिक प्राप्त केला आहे. अंबड परिसरातील बहुचर्चित भंगार बाजार उठविण्यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष तसेच अलीकडे शहरप्रमुख पदांची जबाबदारी देवून विश्वास दर्शवला होता. त्यांच्या नेतृत्वात अनेक मुद्द्यांवर आंदोलने झाली. यामुळेच त्यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात श्री. दातीर यांच्याशी संपर्क साधला असता, पक्षप्रमुख राज ठकारे यांनी आपल्यावर विश्वास दाखवला होता. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने केला. मात्र व्यक्तीगत अडचणी तसेच पुरेसा वेळ देत नव्हता. त्यामुळे पद अडवून ठेवणे आपल्याला पटत नाही. आजवर मी कधीही पदासाठी किंवा काही अपेक्षेने काम केलेले नाही. मात्र राज ठाकरे यांनी स्वतःहून विश्वास दाखवल्याने त्यादृष्टीने काही अडचणी येत होत्या. पक्षहिताचा विचार करून मी बाजुला होत आहे.

Dilip Datir
Devidas Pingle News : शेवटच्या टप्प्यातही पिंगळे विरोधकांना धक्का!

पदाचा राजीनामा दिला आहे,सदस्यत्वाचा नाही, हे स्पष्ट करीत श्री. दातीर म्हणाले, सध्याचे गोंधळाचे राजकीय वातावरण विचार करता, मी अन्य पक्षात जाईल की काय, अशी विचारणा होत आहे. मात्र मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. सदैव मनसेतच राहीन. पक्षाच्या हिताचे जे जे कामअसेल ते करीत राहीन असे मी राज ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.यानिमित्ताने त्यांनी तूर्तास, दातीर यांनी पक्षनिष्ठा अधोरेखित करीत इतर कोणत्याही पक्षात जाण्याची शक्यता फेटाळली आहे. यासंदर्भात स्वतः राज ठाकरे त्यांचा राजीनामा स्विकारणार की अन्य काही निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com