`मनसे` म्हणते, साहित्य संमेलन गीतात स्वा. सावरकरांचा उल्लेख का नाही?

अ. भा. मराठी साहित्य संमेलनामध्ये स्वा. सावरकर यांच्या साहित्याचा उल्लेख टाळल्याची तक्रार आहे.
`मनसे` म्हणते, साहित्य संमेलन गीतात स्वा. सावरकरांचा उल्लेख का नाही?
MNS Office bearersSarkarnama

नाशिक : पुढील महिन्यात येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कामकाज व उपक्रमांत नाशिकचे भूमीपुत्र स्वा. सावरकरांचा अनुल्लेख केला आहे. त्याबाबत संयोजकांनी तातडीने दुरुस्ती करून चुक सुधारावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केली आहे.

MNS Office bearers
शिवसेनेच्या अनिल कदम यांचा आमदार दिलीप बनकरांना संदेश... `टायगर अभी जिंदा है`

याबाबत आज पक्षाचे पदाधिकारी शहर कार्यालयात जमा झाले. यावेळी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर यांनी नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाचे संमेलन गीत तयार करण्यात आले आहे. त्यात सावरकरांचा उल्लेख हवा होता. तसेच संमेलनाच्या कामकाज, विषय पत्रिका व उपक्रमांत कुठेही स्वा. सावरकर यांचा उल्लेख नाही. त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली पाहिजे होती. सावरकर हे नाशिकचे भूमीपुत्र आहेत. त्यामुळे अशा प्रकारे त्यांचा अनुल्लेख करणे योग्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांनी याबाबत आयोजकांचा निषेध केला.

MNS Office bearers
अमरीशभाईंनी चार वेळा बँक बिनविरोध केली, यंदाच का होतेय निवडणूक?

ते पुढे म्हणाले, यासंदर्भात लवकरच संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येईल. संमेलनाच्या संयोजकांनी जी चुक केली आहे. ती भरुन काढण्यासाठी किमान साहित्य संमेलनाच्या स्थळाला सावरकरांचे नाव द्यावे. नाशिकच्या स्थानिक लोकांची भावना समजून घ्यावी.

दरम्यान येत्या ३ ते ५ डिसेंबरला होणाऱे साहित्य संमेलन मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या भुजबळ नॅालेज सिटी शैक्षणिक कॅम्पसमध्ये होत आहे. त्याला यापूर्वीच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरी असे नाव देण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मनसेच्या या मागणीबाबत काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, राकेश परदेशी, संदीप भवर, धीरज भोसले, चिन्मय देशपांडे, प्रफुल्ल बनबैरू, वैभव रौंदळ, शाहबाज काझी, किरण शिंदे, मनोज घोडके, प्रवक्ते पराग क्षिंत्रे, विजय आगळे, निखिल सरपोतदार, योगेश पाटील आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in