MNS News: मनसेतर्फे रस्त्यावर पिंडदान आंदोलन

रस्त्याच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष्य; महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने केला निषेध.
MNS workers agitation for roads repairing.
MNS workers agitation for roads repairing.Sarkarnama

नाशिक : प्रशासनाला (NMC) जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) शहरातील (Nashik) विविध रस्त्यांवर पिंडदान आंदोलन करण्यात आले. शहर, नाशिक रोड परिसर, जयभवानी रोडची सध्या मोठी दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे (Pits on Road) पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालक, रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व दुकानदारांना व्यवसाय करताना धुळीच्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. (MNS aggressive on roads quality & pits)

MNS workers agitation for roads repairing.
Eknath Shinde: खासदार हेमंत गोडसेंचा शिवसेनेला धक्का

शहरातील रस्त्यांवरील खड्डे हा गेले काही दिवस गंभीर प्रश्न बनला आहे. महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावरच कोट्यावधींचे रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. त्यानंतर या सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या आहेत. अनेक आंदोलने झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले वेगळे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

MNS workers agitation for roads repairing.
Jalgaon News: अजित पवार आज गिरीश महाजनांची खरडपट्टी काढणार?

महापालिकेला वेळोवेळी निवेदने देऊन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे यासंदर्भात रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे. महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे, परंतु ते अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेकडून नागरिकांना अपेक्षित असे कामकाज होत नसल्या कारणाने पित्र पंधरवडा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक रोड विभागाकडून रस्त्यावर पिंडदान करत अनोखे श्राद्ध आंदोलन करण्यात आले.

लवकरात लवकर पूर्ण रस्ता चांगला करावा, महापालिका प्रशासन व महापालिका विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी विभाग अध्यक्ष विक्रम कदम, संतोष पिल्ले, सुरेश घुगे, संतोष सहाणे, रोहन देशपांडे, विनायक पगारे, प्रमोद साखरे, नितीन धानापुने, नितीन पंडित, मयूर कुकडे, अशोक ठाकरे, रंजन पगारे, दत्ता कोठुळे, अजिंक्य जाधव, दिलीप सोनकांबळे, शहर अध्यक्ष भानुमती आहिरे, जिल्हाध्यक्ष रीना सोनार, रागिणी कोदे, दीपाली कदम, डिंपल गुप्ता, उपशहराध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे, संदीप कदम, बाबा गोडसे, अविनाश कदम, दिलीप लवटे, तानाजी सहाणे, सुलोचना रणदिवे आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in