Dr. Sudhir Tambe: आमदार डॉ. सुधीर तांबेंना घेतला मुलांचा पाठ!

शिक्षकदिनाचे औचित्य साधत जळगाव येथील भगीरथ शाळेतील विद्यार्थ्यांचा पाठ घेतला.
MLC Dr. Sudhir Tambe at Bhagirth School
MLC Dr. Sudhir Tambe at Bhagirth SchoolSarkarnama

जळगाव : शिक्षकदिन (Teachers Day) विविध उपक्रमांनी साजरा होत असताना विधानपरिषद सदस्य (MLC) आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी चक्क गुरुजी बनत विद्यार्थ्यांचा पाठ घेतला. शिक्षकदिनाचे औचित्य साधत आमदारांनी स्वतःच शाळेत (School) विद्यार्थ्यांना शिकविल्याने या वर्गातील विद्यार्थी देखील अतिशय उत्साहाने त्यात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आमदार तांबे यांना विविध प्रश्न देखील विचारले. (MLC Dr. Sudhir Tambe became a teacher for student)

MLC Dr. Sudhir Tambe at Bhagirth School
Shocking...पोलिस मुख्यालय नव्हे... हा तर ‘सरकारचे जावई पोसण्याचा अड्डा!

सोमवारी शिक्षकदिनाचे औचित्य साधून डॉ. ताबे यांनी भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा वर्ग घेण्याबाबत इच्छा व्यक्त केली. त्यानुसार एका वर्गावर डॉ. तांबे यांनी तासिका घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वर्गात उपस्थित मुलांना त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करत केलेच, शिवाय त्यांच्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरेही दिली.

MLC Dr. Sudhir Tambe at Bhagirth School
`या`मुळे उच्चशिक्षीत सरपंच शीतल नंदन यांना झाली अटक!

स्वच्छतेचे धडे देत मुलांना ओला कचरा, सुका कचरा यातील फरक समजाावून सांगत त्यांना कचऱ्याचे विलगीकरण करुन विल्हेवाट लावण्यासंबंधी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांच्यासमवेत शाळेतील शिक्षक एस.डी. भिरुड, अजित चौधरी, श्‍याम ठाकरे, चांगदेव खेमनर, स्वप्नील भोकरे, गोलू लोखंडे आदी उपस्थित होते.

राष्ट्राच्या उभारणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे शिक्षकदिनी त्यांना वंदन करणे सर्वांचे कर्तव्य ठरते. शिक्षक हे नवी पिढी घडवत असतात. त्यांचे काम तेव्हढे सोपे नसते. मुलांना शिकवणे कठीण काम आहे, याची मला जाणीव आहे.

- आमदार डॉ. सुधीर तांबे

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com