ठाकरे गटाचे आमदार आम्हाला मध्यरात्री फोन करतात ; शहाजीबापूंचा गौप्यस्फोट

Eknath Shinde|Shahajibapu Patil| आता ते फक्त न्यायालयाच्या निकालाची वाट बघतायेत
Shahajibapu Patil|
Shahajibapu Patil|

जळगाव : शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाचे आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाचा निकाल लागला की आम्हीपण शिंदे गटात येणार असल्याचे म्हणतात, असा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. जळगावात बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या आमदारांबाबत मोठा खुलासा केला आहे.याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही निशाणा साधला. आम्ही शिवसेनेचं कसलही वाटोळं केलं नाही. आधी उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, आता त्यांच्या जागी आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. पण आजही ठाकरे गटाचे आमदार मध्यरात्री आम्हाला फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही शिंदे गटात येणार असल्याचं सांगतात. असा खुलासा शहाजीबापू पाटलांनी केला आहे.

Shahajibapu Patil|
RBI : रुपी बँकेला आरबीआयकडून कायमचं टाळं ; परवाना रद्द

शिंदे गटातील आमदारांचा बंंडखोर उल्लेख करण्यावरुनही शहाजी बापू पाटलांनी समाचार घेतला आहे. ''आम्ही पन्नास आमदार बाजीगर आहोत. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणायच्या भानगडीत पडू नका.आम्ही बाजीगर होतो म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो, जातीवंत होतो, मरणाला न घाबरणाऱ्या आमच्या औलादी होत्या. एका कागदावर लिहून आलं म्हणजे कशाची आमदारकी. पण माणसानं प्रामाणिक असायला पाहिजे. जनता आधी, मग नेता, मग पक्ष. आमदारासाठी सगळ्यात आधी जनता असते,राजकारण करताना या तमाम जनतेशी प्रमाणिक राहिल पाहिजे. जनतेशी तुमची बांधिलकी राहायला पाहिजे. कारण या जनतेनं तुम्हाला मुंबईला पाठवलेलं असतं.

जनताच तुमच्या पाठीशी नसेल तर शहाजीबापू पाटीलही मुंबईला जाऊ शकत नाही. नाहीतर बसलो असतो आम्हीही घरात. पण तुम्हीच आम्हाला मुंबईला पाठवलं. त्यामुळे तुमच्या सुख-दु:खाशी आमची नाळ जोडली आहे. तुमचे प्रश्न सोडण्यासाठीच आम्ही हे पाऊल टाकलं. याकडे उदात्त अंतकरणाने बघा, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

आम्ही कोणतं नुकसान केलं शिवसेनेचं. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले तर आम्ही त्यांच्या जागी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं.आता कुणाची खरी शिवसेना? कुणाचा दसरा मेळावा? यावरून कशाला भांडताय. पन्नास आमदार एका बाजुला आहेत आणि १३-१४ आमदार तुमच्याकडे आहेत. त्यातले सात-आठजण आम्हाला रात्री फोन करतात, न्यायालयाचा निकाल लागला की आम्हीपण तुमच्या गटात येतो, असं म्हणतात. आता ते फक्त न्यायालयाच्या निकालाची वाट बघतायेत. असा गौप्यस्फोट शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

पन्नास आमदार, बारा-तेरा खासदार, सर्व जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदेंचे मागे. एवढं सगळ असूनही शिवसेना कोणाची, तर शिवसेना शिंदेची आहे. महाराष्ट्राच्य तमाम जनतेने एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य केलं आहे. जनता शिंदेच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न मिटेल, आया बहिणींची काळजी मिटेल, शेतकरी पुत्र आहे. याच नेत्याला मोठ करायचं काम करा, असे आवाहन यावेळी शहाजीबापू पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com