आमदार सुहास कांदे यांनी आणली २६ गाव पाणी योजना

पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत दहिवाळसह २६ गाव पाणी योजना पुनर्जीवन कामाचा उद्या होणार शुभारंभ
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama

मालेगाव : मालेगाव (Malegaon) तालुक्यातील दहिवाळसह २६ गाव पाणीपुरवठा योजना पुनर्जीवनासाठी (Water supply scheme) आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या प्रयत्नातून २२.९० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते होणार आहे. (Malegaon`s 26 village water supply scheme work will begens soon)

MLA Suhas Kande
Nashik News: नाशिकला डावलणारे जिल्ह्याचे पालकमंत्री कसे?

राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कक्ष अधिकारी डॉ. रवींद्र भराटे यांनी योजना पुनर्जीवनाच्या सुधारीत अंदाजपत्राक व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिदे, मंत्री दादा भुसे व गुलाबराव पाटील यांचेही सहकार्य मिळाले.

MLA Suhas Kande
Eknath Khadse: ...एकनाथ खडसे अमित शहा यांना का भेटले असावे?

दहिवाळ पाणीपुरवठा योजना गेल्या काही वर्षापासून खंडीत वीजपुरवठा, कमी दाबाचा पाणीपुरवठा, तसेच योजनेत तांत्रिक बिघाड होणे, पाणी उपसा करणारे वीज पंप, पाईपलाईन, वारंवार नादुरुस्त होणे आदी अडचणी येत होत्या. यामुळे या योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. गिरणा धरणात मुबलक पाणी असूनही दहा ते पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत होता.

नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. योजनेची दुरुस्ती किंवा योजना पुनर्जीवित करणे गरजेचे असल्याचे आमदार कांदे यांना ‘शिवसेना आपल्या दारी’ या अभियानात जनतेच्या भेटी घेतांना निदर्शनास आले. योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत दहिवाळसह २६ गाव नळ पाणीपुरवठा योजनेस २२ कोटी ९० लाख रुपयांचा निधीस मंजुरी दिली. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंजुमताई कांदे, आमदार सुहास कांदे, मालेगाव, नांदगावच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

प्राप्त निधीतून होणार ही कामे

वीजपंप (मोटारी) बदलणे, गिरणा धरण ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची २१ किलोमीटर लोखंडी नादुरुस्त पाईपलाईन बदलण्यात येईल. सिमेंट पाईप बदलून एचडीपीई पाईपचा वापर होईल. दहीवाळ व कळवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांची गावांतर्गत पाणी वितरण व्यवस्था नव्याने करण्यात येईल. योजनेतील दहिवाळ, माल्हणगाव, रोझे, पाडळदे येथे दोन तर शेरुळ, गिगाव, बोधे, शेंदुर्णी, साजवहाळ, चिखलओहोळ, गुगूळवाड, देवरपाडे या १३ गावांना नवीन जलकुंभ बांधण्यात येतील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in