Maratha Resrvation: शिंदे गटाचे कांदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारशी दोन हात करीन!

MLA Suhas kande says he will fight with government for Maratha reservation-एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी झाले.
Suhas Kande
Suhas KandeSarkarnama

Maratha Reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला आपला पाठींबा आहे. या मागणीसाठी वेळ पडल्यास आपण राज्य सरकारशी संघर्ष करण्यास तयार आहोत. सरकारशी दोन हात देखील करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना दिले. (Maratha community workers agitation for reservation at Manmad)

सत्ताधारी गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas kande) यांच्या उपस्थितीतच नांदगाव (Nandgaon) येथे मराठा समाजाच्या (Maratha) आंदजोलकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या.

Suhas Kande
Dhule Congress News : ‘इंडिया’चा केंद्र, राज्य सरकारने घेतला धसका!

अंतरवाली (जालना) येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजातर्फे दीड तासाहून अधिक काळासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

यावेळी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे, माजी आमदार संजय पवार, महेंद्र बोरसे, विशाल वडघुले, नीलेश चव्हाण, विजय पाटील, राजाभाऊ जगताप, राजाभाऊ देशमुख, संतोष गुप्ता, संजय आहेर, संगीता सोनवणे आदींनी आंदोलनात सहभागी होत विद्यमान सरकारविरोधात घोषणाबाजी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करीत त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.

Suhas Kande
Nashik Congress News : राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार!

यावेळी आमदार कांदे म्हणाले, की मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास मी सरकारच्या विरोधात भूमिका घेईन. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मराठा असून, त्यांना आरक्षणाची जाणीव असल्याने ते नक्कीच आरक्षण मिळवून देतील, असा माझा विश्वास आहे. आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने असून, तुम्ही सांगाल त्या-त्या वेळी आंदोलनात तुमच्या सोबत राहीन.

आम आदमी पक्षाचे जिल्हा महामंत्री विशाल वडघुले, ज्येष्ठ शेतकरी नेेते निवृत्ती खालकर, राहुल दरगुडे व श्री. राऊत या चौघांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रास्ता रोको सुरू असतानाच मुंडण करून निषेध नोंदविला.

Suhas Kande
Girish Mahajan News : वादग्रस्त पोस्ट टाकल्याने धुळ्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल!

यावेळी माजी सभापती विलासराव आहेर, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, ‘मविप्र’चे संचालक अमित पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट), तालुकाध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील, तेज कवडे, नंदू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश बोरसे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरण देवरे, माजी नगराध्यक्ष चेतन पाटील, समाधान पाटील यांच्यासह विविध समाजबांधव सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in