आमदार सुहास कांदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एक `एसएमएस` केला तरी...

पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिक `डीपीडीसी`ची बैठक आज झाली.
आमदार सुहास कांदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी एक `एसएमएस` केला तरी...
Chhagan Bhujbal & MLA Suhas KandeSarkarnama

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या अन्यायाबाबत सध्या माझे तोंडी समाधान करण्यात आले आहे. खरे काय ते १५ दिवसांत कळेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मला साधा एसएमएस जरी केला, तरी मी पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या विरोधातील याचिका मागे घेईन, असे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal & MLA Suhas Kande
शरद पवारांच्या भेटीत उजळले शंभरीतील माजी आमदारांचे ऋणानुबंध!

पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यातील `डीपीडीसी` निधी वाटपाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. या बैठकीत आपण प्रशासनाकडे अनेक प्रश्न व तक्रारी मांडल्या. त्यातून पाच आमदारांची समिती नेमण्यात आली आहे. यापुढी ही समिती निर्णय घेईल. तसेच माझ्याबाबत निधी व कामांच्या मंजुरीतील असमानता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माझे समाधान होईल, तसेच मला ७२ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आज कागदावर माझे समाधान झाले आहे. ते प्रत्यक्षात झाले किंवा नाही हे येत्या १५ दिवसांत कळेल. त्यानंतर मी उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेण्याबाबत निर्णय घेईल.

Chhagan Bhujbal & MLA Suhas Kande
भाजपवासी मधुकर पिचड आदिवासींच्या राजकारणातून साईड ट्रॅक?

यावेळी त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीतील पदाधिकारी जर शिवसेनेच्या आमदारावर असा अन्याय करीत असतील तर हे कसे सहन करायचे?. याबाबत मुख्यमंत्र्याचा एक साधा एसएमएस जरी आला तरी मी भुजबळ यांच्या विरोधातील याचिका मागे घेईल. मात्र सध्या तसे चित्र नाही, असे सांगितले.

बैठकीनंतर श्री. कांदे म्हणाले, नगर उत्थान योजनेच्या ३४ कोटींच्या निधीच दिड पट वाढ करून तो ५२ कोटी झाला आहे. यामध्ये १०२ कोटींच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. त्यात जे नियमबाह्य असेल त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी कार्यकक्षेबाहेर जाऊन निधी वाटप व कामांचे वितरण केले असेल त्यात त्रुटी असल्यास त्यांच्यावर देखील कारवाईचे आश्वासन दिले आहे. मी मांडलेल्या सर्व प्रश्नांची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यावर कारवाई होईल असे सांगितल्याचा दावा देखील त्यांनी केला.

त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत वरिष्ठ नेते व पक्षनेत्यांचे महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न श्री कांदे यांनी आज केला. त्यात पालकमंत्री व आमदार कांदे यांच्यातील वादाविषयी अनिश्चितता वाढणार की कमी होणार ही अनिश्चितता कायम आहे.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in