देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी का घालता?

आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वादाला नवी फोडणी देण्याचा प्रयत्न
Suhas Kande & Devendra Fadanvis
Suhas Kande & Devendra FadanvisSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आज थेट महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan scam) घोटाळ्याची बंड केलेल्या फाईलवरील धुळ झटकण्याचा प्रयत्न केला. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी `फडणवीस यांना तुम्ही भ्रष्टाचाराला पाठीशी का घालता` असा प्रश्न केला. (Suhas kande unhappy with government`s clearification on Maharashtra Sadan scam)

Suhas Kande & Devendra Fadanvis
Trible News: आदिवासींची स्वतंत्र जनगणना करावी!

आमदार कांदे आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काल आमदार कांदे यांनी महाराष्ट्र सदन तक्रारीच्या चौकशीची फाईल न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आली. मात्र त्याबाबत फेरविचार याचिका का करण्यात येत नाही, असा प्रश्न करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तराबाबत असहमती व्यक्त केली.

Suhas Kande & Devendra Fadanvis
MVP Election: मविप्र संस्थेत बाह्य शक्तींना येऊ देणार नाही!

आमदार कांदे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लक्षवेधी मांडली होती. या घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री भुजबळ व त्यांच्या पुतण्याला क्लीन चीट विषयावर वरच्या न्यायालयात आव्हान का दिले नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर अभिप्राय विचारण्यासाठी कायदेतज्ञांकडे हा विषय का नेण्यात आला नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती केली.

त्यावर फडणवीस यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांनी ही फाईल बंद केली. त्यांच्या आदेशाने अपील केले नसल्याचे सांगितले.

या उत्तराने समाधान न झालेल्या आमदार कांदे यांनी, हे गोलमाल उत्तर आहे. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी का घालत आहात. तुमच्याकडे बघूनच आम्ही इकडे आलो आहे, असे सांगत यावर दोन न्यायालयांच्या निकालानंतरच बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे याबाबत अपील केले पाहिजे असा आग्रह धऱला.

त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हस्तक्षेप करीत, मंत्र्यांच्या उत्तराने आपले समाधान होत नसेल तर हवे तसेच उत्तर मिळावे असा आग्रह धरला जाऊ शकत नाही, असे सांगत फडणवीसांच्या मदतीला ते धाऊन आले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in