आमदार सुहास कांदे शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे!

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नांदगावला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे नूतनीकरण झाले.
MLA Suhas Kande & Chhatrapati Sambhajiraje
MLA Suhas Kande & Chhatrapati SambhajirajeSarkarnama

नांदगाव : मुंबईत केलेल्या आंदोलनाने राज्य सरकारवर (State Government) दबाव आला. त्यामुळे शासनाला आमच्या मागण्यांबाबत विचार करणे भाग पडले. तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जयजयकार करा, मात्र त्यांचे विचार व शिकवण देखील आचरणात आणा असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी केले. (Sambhaji maharaj said, state government is came under pressure after agitaion)

MLA Suhas Kande & Chhatrapati Sambhajiraje
पोलिसांच्या नोटीसने मावळते महापौर सतीश कुलकर्णी संतापले!

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व नूतनीकरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बहुजन समाज, अनु. जाती, जमाती, ओबीसी व मराठा समाज एकाच छत्राखाली कसा आणता येईल, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. त्यांचे स्वराज्य अठरा पगड जातींचे होते. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले.

MLA Suhas Kande & Chhatrapati Sambhajiraje
काँग्रेस-राष्ट्रवादी नाही; भाजपसाठी आता टार्गेट फक्त 'शिवसेना'च!

ते पुढे म्हणाले, त्यांचा वंशज म्हणून मी बहुजन समाजाला जोडण्याचे काम करतो आहे. वंचितांच्या विकासासाठी काम करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार नक्कीच करा, पण त्यांचा विचार आणि आचार समजावून घ्या. आमदार सुहास कांदे महाराजांचे सच्चे मावळे आहेत. वंचितांसाठी ते लढत असतात, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नांदगाव नगरीत आगमन झाले. लेझीम व ढोलपथक, हत्तीवरून छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली व्यक्ती, चार घोड्यांच्या रथावर शिवाजी महाराजांचा सोन्याचा मुलामा दिलेला अर्धाकृती पुतळा, भालदार, चोपदार यांच्यासह शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मात्र, संभाजीराजे छत्रपती पायी सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत आमदार सुहास कांदे व शिवसैनिकही होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय...’च्या घोषणांनी नांदगाव दुमदुमले होते. संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. व्यापारी वर्गाने व रस्त्यावरील हातगाडी चालकांनी आपले व्यवहार बंद ठेवून रस्ते मोकळे करून दिले होते. भव्य व्यासपीठावर काशीहून आलेल्या ब्राह्मणांनी मंत्रोच्चार व वेद्‌घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा केली.

या वेळी खासदार संभाजीराजे छत्रपती व आमदार कांदे यांनी अभिषेक केला. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची लाडू तुला करण्यात आली. आमदार सुहास कांदे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना चांदीची तलवार देत मतदारसंघातील जनतेच्या वतीने भव्य सत्कार केला. पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे, संगीता सोनवणे, आमदार सुहास कांदे व श्रीकांत परदेशी यांच्या सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बापूसाहेब कवडे यांनी प्रास्ताविक केले.

या वेळी अंजुम कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, बाजार समिती सभापती तेज कवडे, किरण देवरे, प्रमोद भाबड, विलास आहेर, साईनाथ गिडगे, रमेश बोरसे, तुषार जगताप आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com