पंकज भुजबळांना धक्का देण्यासाठी सुहास कांदे यांनी आणले दोन आमदार!

आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत विविध नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Suhas Kande & Pankaj Bhujbal
Suhas Kande & Pankaj BhujbalSarkarnama

नांदगाव : माजी आमदार पंकज भुजबळांचे (Pankaj Bhujbal) निकटवर्यांतीय व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गोकुळ कोठारी यांच्यासह तालुक्यातील घाटमाथ्यावरील अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशासाठी आमदार सुहास कांदे, (Suhas Kande) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, (Ramesh Bornare) कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत (Udaysingh Rajput) या तीन शिवसेना आमदारांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

Suhas Kande & Pankaj Bhujbal
विरोधकांकडून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न!

कोठारी यांच्या शिवसेना प्रवेशाचा सोहळाही तेवढाच लक्षवेधी ठरला. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शवत यापूर्वी भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी राष्ट्रवादीचा त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ गोकुळ कोठारी यांच्यासह घाटमाथ्यावरील वेगवेगळ्या गावातील कार्यकर्त्यांच्या या शिवसेना प्रवेशाचा घटनाक्रम राजकीय दृष्टीने बोलका ठरतोय.

Suhas Kande & Pankaj Bhujbal
सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या ९२० कोटींचा हिशेब द्या!

गोकुळ कोठारी यांच्यासह अजीम काझी, फैयाज शेख, विनोद साबळे, मनोज रिंढे, अनिता असावा, ठकुबाई पवार, मुजम्मिल सय्यद, पोपट मोरे, तर संतोष गायकवाड (जातेगाव) यांच्या नेतृत्वात बाळू पवार, सुरेश जाधव, किरण चव्हाण, नामदेव करपे, कडुबा त्रिभुवन, नंदू मोरे, चंदनपुरीमधून ईश्‍वर राठोड आदींचा या पक्षप्रवेशात समावेश आहे.

यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे अध्यक्षस्थानी होते. आमदार सुहास कांदे यांनी गोकुळ कोठारी यांचे स्वागत करताना शिवसेनेत प्रवेश केलेल्या सगळ्यांचा सन्मान केला जाईल, असे सांगताना शिवसेनेचा संघटनवाढीचा झंझावात असाच पुढे सुरु ठेवण्याचे आवाहन केले.

वेळी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, प्रमोद भाबड, माजी सभापती विलास आहेर, सुनील जाधव, एन. के. राठोड, अनिल रिंढे, रफिक पठाण, तेज कवडे, महावीर पारख आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com