आमदार कांदे यांनी खडसावले, खोटे पंचनामे का केले?

आमोदे (नांदगाव) येथील जनता दरबारात प्रशासनाला इशारा दिला.
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama

नांदगाव : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (Centre minister of state) डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) व आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त जनता दरबारात (Janta Darbar) आमदार सुहास कांदे यांनी अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) झालेल्या शेतकऱ्यांच्या दैनावस्थेकडे लक्ष वेधताना तालुक्यातील यंत्रणेने पंचनाम्यांना उशिर केल्याबद्दल जाब विचारला. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्याने खडे बोल सुनावले. (MLA instruct revenue department on farmers loss due to heavy rainfall)

MLA Suhas Kande
राहुल गांधींच्या यात्रेबाबत मोठी बातमी, राज्यातील १६ किमीचा टप्पा चार चाकीतून पार करणार; कारण...

दरम्यान, आमदार कांदे यांनी पंचनाम्यांच्या विषयाला हात घातल्याने खोटे पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात येणार असल्याचा बचाव करीत तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी त्याबाबतची माहिती सादर केली. त्यावर आमदार कांदे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मी ॲक्शन मोडमध्ये आल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय करणार नसल्याचा इशारा दिला.

MLA Suhas Kande
अंधेरी रातोमे एक मसीहा निकलता है...वाळू माफीया धास्तावले!

साकोरा जिल्हा परिषदेच्या गटातील आमोदे येथे शुक्रवारी आमदार सुहास कांदे व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या संयुक्त जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. मतदारसंघातील जनतेला येत असलेल्या अडचणी सुटाव्यात, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी ज्येष्ठनेत्या जयश्री दौंड, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे यांच्यासह तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील, पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

महावितरण विभागाच्या अनागोंदीविरोधात देखील तक्रारींचा पाऊस पडला. आमोदे येथे नवीन सबस्टेशन उभारणीसाठी प्रस्ताव वरिष्ठ विभागाकडे पाठवावा, असे आदेश आमदार कांदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आमोदे गावाचा पोखरा योजनेत समावेश व्हावा, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. तर पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे लवकरच मिळतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले.

योजना तळागाळात पोहचवा

घरकुल योजनेत खरे लाभार्थी वंचित राहिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर याबाबत तत्काळ गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशा सूचना मंत्री डॉ. पवार यांनी केल्या. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार जनतेच्या हितासाठीच असून, तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या सर्व योजना पोहोचवा, असे निर्देश देखील या वेळी देण्यात आले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com