Ahmednagar News : आमदार गडाखांच्या पत्नीने धरला दीड हजार महिलांसह नृत्यावर ठेका

Sōnai : विशेष कार्याबद्दल व फक्त दोन कन्या असलेल्या मातांचा सन्मान करण्यात आला
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama

सोनई : (अहमदनगर) आमदार शंकरराव गडाखांची पत्नी सुनीता गडाख यांनी दीड हजार महिलांसह 'मला आमदार झाल्यासारखं वाटतं' या गीतावर नृत्यावर ठेका धरुन जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी विविध आनंदप्राप्तीचे उपक्रम व खेळ पैठणीच्या खेळाने सोहळ्याची रंगत अधिकच बहरली. नेवासे आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण आणि शनैश्वर देवस्थानच्यावतीने आशा व अंगणवाडी सेविकांचा मेळावा शनिशिंगणापूर येथे संपन्न झाला.

Ahmednagar News
Sharad Pawar News :...म्हणून राष्ट्रवादीचा नागालॅंडमध्ये भाजपप्रणित सरकारला पाठिंबा!

या मेळाव्याचे उद्घाटन सुनीता गडाख यांच्या हस्ते झाले. प्रमुख भाषणात गडाख यांनी महिलादिनाचे महत्व सांगून समाजाप्रती आपले योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. आपल्या प्रत्येक प्रश्नासाठी आमदार शंकरराव गडाख हे सदैव आपल्या पाठीशी असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी विशेष कार्याबद्दल व फक्त दोन कन्या असलेल्या मातांचा सन्मान करण्यात आला. दत्तनगरच्या सविता दरंदले खेळ पैठणीचा यामध्ये विजेत्या ठरल्या. निशा भुतकर, सारिका गायकवाड, वंदना धनकर, मिरा दहातोंडे व पुजा आदमाने उपविजेत्या ठरल्या.

Ahmednagar News
Eknath Khadse : एकनाथ खडसेंवर राष्ट्रवादी सोपवणार मोठी जबाबदारी

दरम्यान, शारदाताई फाऊंडेशन व शंकरराव गडाख मित्रमंडळ आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात निवेदक रामकृष्ण भागवत यांनी सामूहिक स्पर्धा म्हणून 'मला आमदार झाल्यासारखे वाटते' या गीतावर नृत्याची हाक देताच सुनीता गडाखांसह सर्व महिलांनी नृत्याचा आनंद घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in