आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!

शिवसेनेचे युवा नेते, माजी आमदार योगेश घोलप यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
आमदार सरोज अहिरे अजितदादांशीही खोटे बोलल्या, त्यांना शिवसेनेचा झटका दाखवू!
Saroj Ahire- Yogesh GholapSarkarnama

नाशिक : आमदार सरोज अहिरे (MLA Saro Ahire) यांनी ज्या कामांचे भूमिपूजन केले आहे. त्यातील बहुतांश कामे मी आमदार असताना मंजूर केलेले आहेत. मात्र त्या कामांचे भूमीपूजन करताना माझ्या परिश्रमाने कामे झाली असा खोटेपणा त्या करतात. हे तातडीने थांबवावे. अन्यथा त्यांना शिवसेनेचा (Shivsena) झटका दाखवावा लागेल, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप (Ex MLA Yogesh Gholap) यांनी दिला आहे.

Saroj Ahire- Yogesh Gholap
शरद पवारांनी सांगितली आठवण...म्हणाले संरक्षणमंत्री झाल्यावर थेट कोल्हापूर गाठले!

शिवसेनेचे युवा नेते योगेश घोलप यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांचा खोटेपणा उघडकीस आणला. मतदारसंघातील विकासकामांबाबत त्यांनी विविध माहिती दिली. ते म्हणाले, श्रीमती आहेर या आमदार आहेत. आमदारांचे वर्तन जबाबदारपणाचे असावे अशी अपेक्षा असते. मात्र श्रीमती अहिरे यांनी खोटेपणाची हद्द केली आहे. अगदी मंत्र्यांना सुद्धा खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करतात. हे त्यांनी तातडीने थांबवावे. यापुढे आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊन त्याचे भूमीपूजन करण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने ते कार्यक्रम बंद पाडेल. श्रीमती अहिरे यांना शिवसेनेचा झटका दाखवून देऊ.

Saroj Ahire- Yogesh Gholap
बच्चू कडूंना आव्हान, आत्मदहनाचा प्रयत्न, गजू घोडके आहेत कोण?

श्री. घोलप म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी मतदारसंघातील सय्यद पिंप्री येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जवळपास ५१ कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन केले. त्यात माझ्या कार्यकाळात ७ जून २०१९ रोजी मंजूर झालेली कामे होती. राज्यात सात कॅन्टोनमेंट आहेत. त्यांना विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मी पाठपुरावा केला. २०१८-१९ या आर्थिक वर्षात मंत्री मंडळाच्या बैठकीत त्याबाबत ठराव मंजूर झाला. नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाने निधीमंजूर करून दिला. त्यात देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाला निधी मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. २२ ऑक्टोबर २०१८ ला शासनाने थेट निर्णय घेऊन ५ कोटींचा निधी मंजूर केला. मात्र ही सर्व कामे राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मीच मंजूर करून आणली आहेत, असा आव सरोज अहिरे यांनी आणला. शिवसेनेच्या प्रयत्नाने व नेत्यांनी मंजूर केलेली विकासकामे व निधीचे श्रेय आपण घ्यावे का हा आत्मचिंतनाचा विषय आहे. जर त्यांनी काम मंजूर करून आणले असेल तर त्याचे श्रेय त्यांनी जरूर घ्यावे. मात्र इतरांच्या कामाचे श्रेय लाटणे व मीच कामे केली असा कांगावा आणदार अहिरे करीत आहेत.

माजी आमदार घोलप म्हणाले, यापूर्वीच्या युती सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सात कामे मंजूर करून त्यासाठी दहा कोटींचा निधी मंजुर केला होता. त्यानंतर लगेचच विधानसभा निवडणूक झाली. त्यामुळे त्याचे भूमीपूजन करता आले नाही. आज संबंधित कामांचे कार्यक्रम विद्यमान आमदार घेऊन जनतेत धुळफेक तरीत आहेत. मात्र जनता खुळी नाही. त्यांना सर्व समजते. यापूर्वी देखील ग्रामीण पेयजल योजनेतून देवळाली मतदारसंघात २१ गावांसाठी सुमारे ३१ कोटींच्या कामांना मंजूरी मिळाली होती. ती देखील मीच केली असा आरडोओरड करीत त्याचे भूमीपूजन अहिरे यांनी केले. शिवसेनेने कोणताही विरोध न करता महाविकास आगाडीचा धर्म पाळून संयम ठेवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील अहिरे यांनी खोटी माहिती दिली. त्यामुळे प्रत्येकवेळी शिवसेनेनेच आघाडीचा धर्मका पाळावा. यापुढे आम्ही असे प्रकार सहन करणार नाही. यापुढे असा प्रकार झाल्यास आमदार अहिरेंना शिवसेनेचा झटका देऊन ते कार्यक्रम शिवसेना स्टाईल उधळून लाऊ.

...

Related Stories

No stories found.