RTO ने हे काय केले...आमदार सावकारेंची कार ट्रान्सफर टू परिवहन मंत्री परब!

भाजपचे भुसावळचे आमदार सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावे ट्रान्सफर झाली.
Anil Parab & Sanjay Savkare

Anil Parab & Sanjay Savkare

Sarkarnama

जळगाव : RTO विभागाविषयी फारशा चांगल्या बातम्या येत नाही. त्यात एक नवी भर पडली आहे. वजन व एजंट याशिवाय कागद न सरकावणाऱ्या या विभागातून भाजपचे (BJP) आमदार संजय सावकारे यांची कार थेट परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या नावावर झाली. गंमत म्हणजे अधिकारी व तीन लिपीकांच्या स्वाक्षरी व तपासणीनंतर ते झाले. याबाबत सावकारे मात्र पूर्णता अनभिज्ञ आहेत.

<div class="paragraphs"><p>Anil Parab &amp; Sanjay Savkare</p></div>
मालेगाव स्फोटात गौप्यस्फोट; माजी IPS अधिकाऱ्याचे आर आर पाटलांकडे बोट!

भुसावळचे आमदार सावकारे यांची कार (एमएच १९- सीझेड ५१३०) राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर जळगाव आरटीओ कार्यालयातून परस्पर ट्रान्सफर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

<div class="paragraphs"><p>Anil Parab &amp; Sanjay Savkare</p></div>
खासदार उन्मेष पाटील यांच्या `या` उपक्रमाचे होतेय कौतुक!

ही टोयोटा कार २३ फेब्रुवारी २०२१ रोजी आरटीओत नोंदणी झाली आहे. आता ती २४ डिसेंबर २०११ ला अनिल दत्तात्रय परब (रविकिरण को-ऑप. सोसा. बांद्रा पूर्व, मुंबई) या नावाने ट्रान्सफर झाली. या ट्रान्सफर कागदपत्रांवर आरटीओचे तीन लिपिक व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. वाहन खरेदी व ट्रान्सफर करताना नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येतो. तो अपडेट केल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण होते. सावकारेंना ओटीपी आला नसताना हा प्रकार घडला. काहीही खातरजमा न केल्यामुळे आता या चौघांची झोप तर उडालीच मात्र या यावर कार्यालयातील सावळा गोंधळ किती गंभीर स्वरूपाचा आहे हे पुढे आले.

दरम्यान, या संदर्भात बोलताना आरटीओ श्याम लोही यांनी सांगितले की, हा प्रकार धक्कादायक आहे. हे उघड झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाला माहिती दिली आहे. सखोल तपासासाठी पोलिसात तक्रार दाखल केली जाईल, या प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दरम्यान आमदार संजय सावकारे यांनीही जळगाव आरटीओ कार्यालयात भेट देऊन नेमका प्रकार काय याची माहित घेतली. याबाबत चौकशीची मागणी त्यांनी केली. एका आमदाराबाबत असा प्रकार घडतो तर सामान्यांचं काय? असा सवाल आमदार सावकारे यांनी केला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com