आमदार राहुल ढिकले यांनी नाशिकची पाणी योजना मार्गी लावली!

शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी सव्वादोनशे कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा.
MLA Rahul Dhikle news, Nashik News update
MLA Rahul Dhikle news, Nashik News updateSarkarnama

नाशिक : शहराच्या (Nashik) वाढत्या विस्तारात पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या (Centre Government) अमृत-२ योजनेत २२६. ३४ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या निधीतून नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत आमदार ॲड. राहुल ढिकले (Rahul Dhikle) यांच्या तारांकित प्रश्‍नाला उत्तर देताना माहिती दिली. (MLA Rahul Dhikle News Updates)

MLA Rahul Dhikle news, Nashik News update
महापौरांचा हट्ट पुरवला... मात्र फक्त पाच दिवसांसाठी!

शहराला गंगापूर, मुकणे, दारणा धरणातून पाणीपुरवठा होतो. तीनही धरणातून दररोज जवळपास चार दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाते. सात जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून १२२ जलकुंभावरून घरोघरी पाणीपुरवठा होतो. जल वितरणासाठी जवळपास २२०० किलो मीटर पाइपलाइनचे जाळे उभारण्यात आले असून, दोन लाख ३०० घरांना जोडण्या देण्यात आल्या आहेत.

MLA Rahul Dhikle news, Nashik News update
अजितदादा बोलले पुण्यात...नेत्यांची झोप उडाली महाराष्ट्रात!

जलशुद्धीकरण केंद्रांत पाणीपुरवठा करण्यासाठी ८५ किलोमीटरच्या रॉ वॉटर पाइपलाइन आहे. शुद्धीकरण झालेले पाणी जलकुंभात भरण्यासाठी १०५ किलोमीटरच्या मुख्य पाइपलाइन आहेत. मात्र शहराचा विस्तार वाढत असताना समान पाणीपुरवठा होण्यासाठी आणखी ३०० किलोमीटर वितरण वाहिन्यांचे जाळे पसरविण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी महापालिकेकडून जवळपास २२६ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला होता. (Nashik News update)

अमृत-१ योजनेत शहराच्या पाणीपुरवठा आराखड्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु, अमृतचा निधी संपल्याने प्रकल्प रखडला होता. त्या अनुषंगाने आमदार ढिकले यांनी तारांकित प्रश्‍नाच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पाला चालना दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा निधी संपल्याने अमृत २.० मध्ये राज्य कृती आराखड्यात समावेश करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

या योजनेत २०२६ पासून तीस वर्षांचे पाणी वितरणाचे नियोजन आहे. गंगापूर धरणातील रॉ वॉटर पाइपलाइन बदलण्यात येणार आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते सातपूर दरम्यान लोखंडी पाइपलाइन टाकण्यात येईल. शहराला दरडोई १३५ लिटर प्रतिदिन पाण्याची व्यवस्था असुन तीनशे किलोमीटर जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येईल.

शासनाकडे दोन वर्षांपासून सुधारित आराखडा पडून आहे, परंतु राज्य वार्षिक कृती आराखड्यात समावेश केला जात नव्हता. नगरविकासमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेत समावेश करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. आता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावू.

- अॅड. राहुल ढिकले, आमदार

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com