आमदार प्रशांत बंब यांच्या वक्तव्यामागे फार मोठे षडयंत्र!

अंगणगाव (येवला) येथे राष्ट्र सेवा दलातर्फे झालेल्या चर्चासत्रात विविध मान्यवरांनी भाग घेतला.
Arjun Kokate
Arjun KokateSarkarnama

येवला : आमदार प्रशांत बंब (MLA Prashant Bamb) नावाच्या उच्चशिक्षित, उच्चवर्णीय (Upper cast) आमदाराने आपली मळमळ व्यक्त करताना शिक्षकांविषयी हाकाटी पिटवली होती. खरंतर हे केवळ एकट्या बंब यांचे मत नाही, तर ज्यांना या देशाचा कारभार भारतीय संविधानातील (Constitute of India) कायद्यांप्रमाणे चालू द्यायचा नाही, अशा देशातील धनिकांचे फार मोठे षडयंत्र असल्याचे मत राज्य राष्ट्र सेवा दलाचे (Rashtra Seva Dal) अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे (Arjun Kokate) यांनी व्यक्त केले. (That statement is Representative of a class who not belive on Rules & Regulation)

Arjun Kokate
Trible News: समस्या सोडविण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांचा बसने प्रवास

समता प्रतिष्ठान आणि राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित नवीन शैक्षणिक धोरण वस्तूस्थिती व विपर्यास याविषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. कोकाटे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी सरकारी पातळीवरून होणाऱ्या शिक्षक दिनास स्पष्ट शब्दात विरोध नोंदविला. शिक्षक दिन हा महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Arjun Kokate
Revenue : महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्याच

जागतिकीकरणानंतर शिक्षण आणि शेतीचे वाटोळे झाले असून, शिक्षण क्षेत्रावर या देशातील उद्योगपतींनी आणि भांडवलदारांनी कब्जा मिळविला आहे, तर शेती क्षेत्राचे सरकारी पातळीवरच अधःपतन सुरू आहे.

देशातील कोट्यवधी सरकारी शाळा बंद करून शिक्षणचे बाजारीकरण करीत शिक्षण इतके महाग केले जात आहे. बंब यांच्यासारख्या गडगंज संपत्तीत लोळणाऱ्या माणसांना सरकारी शाळांमधील शिक्षण वाईट असते, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. शिक्षकांना अलीकडे शिकवण्याशिवाय अनेक कामे शासन पातळीवरून दिली जातात आणि त्यामुळे झालेच तर शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष होते.

बंब यांना ग्रामीण भागातील शाळांची आणि विद्यार्थ्यांची फारच काळजी असेल, तर त्यांनी शाळेव्यतिरिक्त या शिक्षकांना सरकारने दुसरे कोणतेही काम सांगू नये, अशी मागणी करायला हवी होती. बंब यांना शिक्षण आणि शिक्षकाविषयी फारच कळवळा असेल तर त्यांनी केंद्र सरकारने सध्या जे नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे, ते खऱ्या अर्थाने सरकारी शाळा बंद करायला लावणारे धोरण आहे. बंब ज्या गाडीतून प्रवास करतात त्या गाडीच्या काळ्या काचा कायम बंद असतात, असा आरोप करत तथाकथित शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी बंब यांचा जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यापूर्वी ग्रामीण भागातील शाळा इमारती, पुरेशी शिक्षक, पिण्याची पाण्याची व्यवस्था, शौचालय, बाथरूम या सगळ्या सोयी-सुविधा पुरविण्याची तातडीने व्यवस्था करण्याची गरज असल्याची मागणी प्रा. कोकाटे यांनी केली.

प्रा. ओंकार बिडवे, बाबासाहेब कोकाटे, प्रा. रंजना गाडे, प्रा. कल्पना माने, प्रा. अविनाश मांवडे, प्रा. प्रतीक्षा थेटे, छाया धुळसुंदर, महेंद्र विघे, सलील पाटील, सुखदेव आहेर आदींनी चर्चासत्रात मते मांडली. सूत्रसंचालन वैष्णवी साताळकर, कृष्णाली कोकाटे, प्रज्ञा पगारे यांनी केले.

बंब यांना वास्तव कधी दिसणार

कमी पटाच्या लक्षावधी शाळा बंद करणे, शिक्षणाचे खासगीकरण वाढविणे, हजारो महाविद्यालये बंद करणे, व्यावसायिक शिक्षणाच्या नावाखाली मूलभूत शिक्षणाच्या प्रवाहातून वंचितांना आउट करणे हेच या नवीन शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्दिष्ट आहे. बंब यांना हे वास्तव कधीच दिसणार नाही, असेही प्रा. अर्जुन कोकाटे म्हणाले.

......

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com