Gram Panchayat Results : आणखी एका पुतण्याचा काकांना धोबीपछाड; आमदार बबनराव पाचपुतेंना मोठा धक्का

Ahmednagar Gram panchayat Election Result : महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांचा मोठा संघर्ष
Babanrao Pachpute and Sajan Pachpute
Babanrao Pachpute and Sajan PachputeSarkarnama

Ahmednagar Gram panchayat Election Result : आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. या पार्श्वभूमीवरच अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत झाली होती. यामध्ये माजी मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केला आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते यांचा मोठा वाटा होता. मात्र दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते यांचे निधन झाले. त्यानंतर पाचपुते कुटुंबात संघर्ष सुरू झाला आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बबनराव पाचपुते यांच्या पॅनलला त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आव्हान दिले. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती.

Babanrao Pachpute and Sajan Pachpute
Gram panchayat Result : बाळासाहेब थोरातांच्या आनंदावर विरजण; विखेंनी केला 'करेक्ट' कार्यक्रम

मुलगा प्रतापसिंह यांच्या प्रचारासाठी त्यांनी मोठी यंत्रणा उभी केली होती. मात्र तरी देखील साजन पाचपुते यांनी १९० मतांनी विजय मिळवत सरपंचपद मिळवले. या ग्रामपंचायतीमध्ये १७ जागा असून त्यापैकी बबनराव पाचपुते यांच्या पॅनलने १० तर साजन पाचपुतेंच्या पॅनलने ७ जागा मिळविल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा बबनराव पाचपुते यांच्या गटाने मिळविल्या असल्या तरी सरपंचपद त्यांना मिळवता आले नाही.

Babanrao Pachpute and Sajan Pachpute
Gram panchayat Result : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका; निळवंडे ग्रामपंचायतीत दणदणीत विजय!

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांचा मोठा संघर्ष पाहायला मिळतो. यामध्ये बीडच्या (Beed) क्षीरसागर कुटुंबासह राज्यातील अनेक घराण्यामध्ये काका-पुतण्यांचा संघर्ष पाहायला मिळतो. यामध्ये बीडच्या क्षीरसागर कुटुंबात फूट पडली आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले.

आता अहमदनगरच्या श्रीगोंदा (Srigonda) तालुक्यात देखील काका-पुतण्यांच्या लढतीमध्ये पाचपुते यांच्या घराण्याचं नाव सामील झालं आहे. बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांना बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com