NCP News: कळवणला राष्ट्रवादीच्या आमदार नितीन पवार समर्थकांची बाजी!

ग्रामपंचायतीत धक्कादायक निकालातून स्थानिक राजकीय नेत्यांना मिळाली चपराक
MLA Nitin Pawar
MLA Nitin PawarSarkarnama

कळवण : तालुक्यातील (Kalwan) २२ ग्रामपंचायतींमधील (Village Panchayat) थेट सरपंच व १९६ ग्रामपंचायत सदस्यांमधील बहुतांशी नवनिर्वाचीत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांना मानणारे आहेत. सर्वच ठिकाणी नव्या दमाच्या युवकांची सरशी झाली आहे. (NCP MLA Nitin Pawar bagged maximum seats in Grampanchayat)

MLA Nitin Pawar
NCP News: नरहरी झिरवळांनी दिंडोरीत राष्ट्रवादीचे वर्चस्व राखले

तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींपैकी खेडगाव व पाटविहीर येथे थेट सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत, तर नाकोडे येथील थेट सरपंचासह तालुक्यातील २० ग्रामपंचायतीमधील १०७ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले होते. १९ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह २० ग्रामपंचायतीमधील ८९ ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत मतदारांनी धक्कादायक निकाल देत स्थानिक नेत्यांना चपराक दिली आहे.

MLA Nitin Pawar
Nana Patole: नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे

तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमधील थेट सरपंच व १९६ ग्रामपंचायत सदस्यांमधील बहुतांशी आमदार नितीन पवार यांना मानणारे असून, सर्वच ठिकाणी सर्वाधिक युवक वर्गाची सरशी झाली आहे. पक्षीय चिन्हावर ग्रामपंचायत निवडणुका लढविल्या जात नसल्याने स्थानिक गटा-तटावर निवडणुकीची मोर्चेबांधणी केली जाते. आमदारांसह तालुकास्तरीय नेते गावपातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत सहसा भाग घेत नसल्याने गावपातळीवर निवडणुका गटतटात झाल्या. स्थानिक नेत्यांना मतदारांनी आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा निकाल दिला असून, तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या अभद्र युतीला जनतेने नाकारत गावपातळीवर विकासकामे करणाऱ्यांना साथ दिली आहे.

हाय व्होल्टेज नवी बेज येथे बाजार समितीचे माजी सभापती धनंजय पवार, माणिक देवरे, चंद्रकांत पवार, प्रभाकर खैरनार, मधुकर वाघ यांच्या नेतृत्वाखालील नम्रता पॅनलने ग्रामविकास पॅनलचा पराभव करीत सत्ता राखली. कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात सकाळी दहाला तहसीलदार बंडू कापसे यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी झाली. एकूण पाच फेऱ्या करण्यात आल्या होत्या.

थेट सरपंचपदाचे विजयी उमेदवार

धार्डेदिगर : शाहू चव्हाण, विसापूर : बापू पवार, वडाळेवणी : गायत्री बागूल, रवळजी : मीना गायकवाड, मोकभणगी : मंदा पवार, मळगाव : अनुसया गांगुर्डे, भैताणेदिगर : दीपाली कोल्हे, भेंडी : किशोर ठाकरे, नाळीद : बाळू पवार, नवीबेज : रुपाली गांगुर्डे, दह्याणे दिगर : जिभाऊ बहिरम, जुनी बेज : सुनील पवार, गोबापूर : गंगाधर खांडवी, पिंपळे बु॥ : रमेश बागूल, ककाणे : हिरामण ठाकरे, गणोरे : मंगला बहिरम, दरेभणगी : सुनीता चौरे, आठंबे : विष्णू बागूल, साकोरे : साहेबराव गांगुर्डे.

कळवण तालुक्यात सध्या आमदार नितीन पवार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार यांच्यात राजकीय विभागणी झालेली आहे. कार्यकर्ते या दोन्ही गटांत विभागलेले आहेत. त्याचे राजकीय पडसाद बहुतांश निवडणुकांत दिसतात. त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकांत देखील दिसली. त्यात सध्या तरी ज्याला सोयीचे असेल तशी समिकरणे दिसून आली. मात्र आमदार नितीन पवार यांना ही निवडणूक लाभदायी ठरली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in