गायरान अतिक्रमणांच्या बाजुने आमदार कोकाटे मैदानात!

आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत सिन्नरला अतिक्रमणधारकांचा जनआक्रोश मेळावा.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama

सिन्नर : शहरातील (Sinner) जवळपास ४११ तर तालुक्यातील गोंदे, दातली व शहा आदी गावांतील काही गायरान जमिनीवरील (Government land) अतिक्रमणधारकांना दहा दिवसांची मुदत देत अतिक्रमणे काढण्यास नगर परिषद (Sinner municipal council) व पंचायत समिती स्तरावरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमणधारकांमध्ये घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी संबंधितांचा जनआक्रोश मेळावा घेतला. (MLA Kokate takes a meeting of encroachment holders in sinner city)

Manikrao Kokate
नाशिकच्या रस्त्यांची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा!

गायरान जमिनींवरील अतिक्रमणांच्या विरोधात सुरु असलेल्या कारवाईने सिन्नर शहरात नागरिक त्रस्त आहेत. याबाबत त्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली होती. आता यासंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे देखील मैदानात उतरले आहेत.

Manikrao Kokate
ED On Sanjay Raut : राऊतांच्या जामीन अर्जाविरोधातील ED च्या याचिकेवर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने २०११ ला गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याबाबतचा निकाल दिलेला आहे. त्यानंतर नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिल्यानंतर अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. राज्य सरकारने उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडायला हवी. राज्य शासनाकडे यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. या लढ्यासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची असून बेघर झालेल्यांना आधार देणे हे माझे प्रथम कर्तव्य असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी अतिक्रमणधारकांना आज आश्वासन दिले.

माणिकराव कोकाटे म्हणाले, ज्यांना नोटिसा आलेल्या आहेत अशा सर्व कुटुंबीयांनी जनहित याचिका दाखल करून कोर्टात न्याय मागावा. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही यासाठी जी काही मदत लागेल ती सदैव करेल. असे त्यांनी नमूद केले. मेळाव्यासाठी तालुक्यासह शहरातील अतिक्रमणधारक उपस्थित होते. त्यांनी आलेल्या नोटिसांचे वाचन केले.

या प्रसंगी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे, माजी सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, बाळासाहेब उगले, बाजार समितीचे माजी सभापती विनायक तांबे, अॅड. जयसिंह सांगळे, माजी नगरसेवक रामभाऊ लोणारे, अशोक मोरे, मल्लू पाबळे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष मनीषा माळी, वासंती देशमुख, बोराडे मोहचे माजी सरपंच सुदाम बोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष कुंभार, अनिल वराडे, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, संभाजी जाधव, कृष्णा कासार, अॅड. देवेंद्र खरात, शेखर गोळेसर, नवनाथ गडाख, हेमंत भाबड, किरण गोजरे, सतीश कोकाटे आदी उपस्थित होते.

आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट

माणिकराव कोकाटे म्हणाले, या कार्यवाहीला मुदतवाढ मिळते किंवा काय यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री यांनाही पत्र पाठवले आहे. न्यायालयात जाण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी २०११ पूर्वीची विजबिले, घरपट्टी, नळपट्टी, शौचालय, घरकुल आदी शासकीय योजनांचे अनुदान मिळालेले असल्यास त्याचे पुरावे संपर्क कार्यालयात जमा करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com