मतदारसंघ अन् होमग्राऊंडवरही आमदार माणिकराव कोकाटेच `किंग`

सोमठाणे सोसायटीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाचे ११ संचालक विजयी झाले.
MLA Manikrao Kokate & Won candidates

MLA Manikrao Kokate & Won candidates

Sarkarnama

सिन्नर : आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना ग्रामपंचायत निवडणुकीत घरातून अर्थात सख्ख्या भावाकडूनच राजकीय आव्हान मिळाले होते. त्याची परतफेड करीत मतदारसंघाबरोबरच गावच्या राजकारणातही आपणच किंग असल्याचे त्यांनी सिद्ध केले. राजकारणाची पहिली पायरी असलेल्या सोसायटीच्या (Cooperative Society) निवडणूकीत त्यांनी भावाच्या पॅनेलचा पराभव करीत १३ पैकी ११ जागा जिंकल्या.

<div class="paragraphs"><p>MLA Manikrao Kokate &amp; Won candidates</p></div>
तालकटोरा स्टेडीयममध्ये संविधानिक आरक्षणासाठी ओबीसींची गर्जना!

आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमठाणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवला. विरोधी गटाचे त्यांचे धाकटे बंधू असलेल्या भारत शिवाजीराव कोकाटे हे स्वतःसह अन्य एक उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी झाले.

<div class="paragraphs"><p>MLA Manikrao Kokate &amp; Won candidates</p></div>
देवीदास पिंगळेंनी भाजपच्या दिनकर पाटील पॅनेलचा उडवला धुव्वा!

आमदार कोकाटे आणि त्यांचे धाकटे बंधू भारत कोकाटे यांच्यात ग्रामपंचायत निवडणुकीपासून गृहयुद्ध सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भारत कोकाटे यांनी बाजी मारल्याने सोसायटी निवडणूक आमदार कोकाटे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती. आ. कोकाटेंना आव्हान देऊन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गोटात दाखल झालेल्या भारत कोकाटे यांनी सोसायटी निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभा केला होता. त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी या संपूर्ण निवडणुकीची धुरा सांभाळली. निवडणूक निर्णय अधिकारी आर. बी. त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता.१९) दिवसभर मतदान झाल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. भारत कोकाटे यांनी फेरमतमोजणीचा आग्रह धरल्यानंतर फेरमतमोजणीतही निकाल कायम राहिले.

सर्वसाधारण खातेदार कर्ज प्रतिनिधी गटात आमदार कोकाटे गटाचे दयानंद बाजीराव कोकाटे (२४२), दिलीप बाबूराव कोकाटे (२४८), विक्रम लहानू कोकाटे (२३६), शरद निवृत्ती कोकाटे (२२५), शिवप्रसाद कोकाटे (२२५), भाऊलाल गुलाब धोक्रट (२३५), उत्तम निवृत्ती पदाडे (२३९) हे विजयी झाले. या गटात स्वतः भारत शिवाजीराव कोकाटे (२५३) हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. पराभूत उमेदवारांत अरुण कोकाटे (२२४), दिनकर तुकाराम कोकाटे (२०९), नारायण सखाहरी कोकाटे (२०८), बद्रीनाथ भास्कर कोकाटे (२१३),ज्ञानेश्वर कोकाटे (२१७), मगन विठोबा कदम (२०६), सोमनाथ जगताप (२०७), सोमनाथ रुकारी (१७७) यांचा समावेश आहे. या गटातील ५११ पैकी ४८ मतपत्रिका बाद झाल्या.

महिला प्रतिनिधी गटात आशाबाई कोकाटे (२५०), रंजना कोकाटे (२४१) यांनी भारत कोकाटे गटाच्या छबुबाई धोक्रट (२३२) आणि द्वारकाबाई धोक्रट (२२८) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती -जमाती गटात श्रीहरी साळवे (२५९) यांनी भगवान साळवे (२३९) यांचा २० मतांनी पराभव केला. इतर मागासवर्गीय प्रवर्गात भारत कोकाटे गटाचे मधुकर धोक्रट (२६४) यांनी आमदार गटाचे बाळेश्वर धोक्रट (२३४) यांचा पराभव केला. विमुक्त जाती भटक्या जमाती गटात लकी बैरागी (२५१) यांनी घमन गोसावी (२४८) यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com