आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांचा शिवसेनेला धक्का!

सिन्नर मतदारसंघातील शिवडे सोसायटीत माणिकराव कोकाटे गटाचे वर्चस्व.
MLA Manikrao Kokate & Rajabhau Waje
MLA Manikrao Kokate & Rajabhau WajeSarkarnama

सिन्नर : सिन्नर (Sinner) विधानसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या शिवडे-बोरखिंड विविध कार्यकारी सोसायटीच्या (Co-operative society) पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे (ManikraoKokate) समर्थक गटाच्या आपल्या पॅनलने सर्व १३ जागा जिंकून घेत विरोधकांना पराभूत केले. महाविकास आघाडीतच रंगलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेवर (Shivsena) मात केली.

MLA Manikrao Kokate & Rajabhau Waje
फडणवीसांनी ओबीसी, मराठ्यात लावली भांडणे

आगामी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात विविध कार्यकारी सहकारी सोसायटयांवर वर्चस्व आवश्यक आहे. त्यामुळे सध्या विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम असल्याने आमदार व त्यांचे प्रतिस्पर्धी निवडणुकांच्या डावपेचांत व्यस्त आहेत. विशेषतः गाव पातळीवरील राजकीय नेत्यांच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या आहेत. त्यात या सोसायटीत आमदार कोकाटे सरस ठरले.

MLA Manikrao Kokate & Rajabhau Waje
नाशिकमध्ये ३९ मशिदींना अजानची परवानगी नाकारली!

सोसायटीची निवडणूक समर्थक आपला पॅनल व माजी आमदार राजाभाऊ वाजे समर्थक गटाच्या जनसेवा पॅनलमध्ये लढली गेली. सरपंच प्रभाकर हारक, अनिल शेळके, सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनल, तर माजी चेअरमन अंबादास वाघ, दिलीप हारक, भास्कर वाघ, अशोक हारक यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाकडून जनसेवा पॅनलची मोर्चेबांधणी करण्यात आली होती. सर्वसाधारण व कर्जदार गटातून चंद्रभान चव्हाणके, भाऊसाहेब माळी, सोमनाथ वाघ, पोपट सोनकांबळे, अनिल हारक, अण्णा हारक, किरण हारक, भाऊसाहेब हारक, इतर मागासवर्ग गटातून अनिल शेळके, अनुसूचित जाती-जमाती गटातून विलास पाडेकर, महिला राखीव गटातून लंकाबाई जुंद्रे, चंद्रभागा हारक, विमुक्त जाती व भटक्या विशेष मागास वर्गातून लक्ष्मण वाघ हे आपला पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी एस. जी. वाघ यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. ४८९ पैकी ४४९ सभासदांनी मतदान केले. निवडणूक निकालानंतर कोकाटे समर्थकांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in