lata sonawane, eknath shinde
lata sonawane, eknath shindesarkarnama

मोठी बातमी : शिंदे गटाचा एक आमदार कमी होणार ? ; लता सोनवणे यांना दिलासा नाहीच !

lata sonawane : लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे.

जळगाव : शिंदे गटात दाखल झालेल्या आमदार लता सोनवणे (lata sonawane)यांचे जात वैधता प्रमाणपत्रबाबत (caste certificate) हायकोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला असल्याची माहिती चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी दिली. (mla lata sonawane news update)

शुक्रवारी (९ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय घटनापीठाचे सदस्य न्या.के.एम. जोसेफ व न्या. ऋषिकेश रॉय यांनी आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविण्याबाबतचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लता सोनवणे या २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.

 lata sonawane, eknath shinde
Sunil Raut : दिल्लीत राजकीय भेटीसाठी आलो नाही ; राऊतांचा दावा

माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी यांनी त्यांच्या निवडीला आव्हान देत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार औरंगाबाद खंडपीठाकडे केली होती. यावर खंडपीठाने नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे चौकशीचे आदेश दिले होते.

जगदीशचंद्र वळवी म्हणाले, "उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला आहे. आता यासंदर्भातील प्रक्रिया निवडणूक आयोग व प्रशासनाची आहे. ती जलद गतीने व्हावी. आमदार लता सोनवणे यांचे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस मागणी आहे.तसेच विधानसभेत दोन नंबरच्या उमेदवाराला विजय घोषित करावे," लता सोनवणे यांनी याबाबत आपले मत अद्याप व्यक्त केलेले नाही.

याबाबत त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे म्हणाले, "या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करणार आहोत. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल याची खात्री आहे," लताताई सोनवणे यांनी शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांची आमदारकी रद्द झाल्यास शिंदे यांच्या गटाचे संख्याबळ एका सदस्याने कमी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com