Pachora Bazar Samiti Election : पाचोऱ्यात ठाकरेंच्या सभेनंतरही शिवसेना आमदार किशोर पाटलांनी गड राखला

Shivsena MLA Kishore Patil : उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी सभा झाला होती.
 Shivsena MLA Kishore  Patil
Shivsena MLA Kishore Patil Sarkarnama

Shivsena MLA Kishore Patil Pachora Bazar Samiti Election : जळगाव जिल्ह्यातील भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे आमदार आमदार किशोर पाटील यांनी आपला गड राखला आहे.

प्रचंड चुरस असलेल्या या निवडणुकीत अखेर आमदार किशोर पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीपूर्वी येथे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात जंगी सभा झाला होती.

 Shivsena MLA Kishore  Patil
Bazar Samiti Election: दूध संघानंतर बाजार समितीतही भाजप आमदार चव्हाणांचे वर्चस्व ; चाळीसगावात सत्ता खेचून आणली..

पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेतर्फे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मैदानात होते.या निवडणुकीत १८ जागांसाठी तीन पॅनलमध्ये लढत झाली. यात किशोरआप्पा पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या. भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे स्वतंत्र पॅनल उभे होते.

महाविकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले असून अमोल शिंदे यांच्या पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. यामळे आमदार किशोर पाटील यांनी गड राखला. महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार दिलीप वाघ तसेच वैशाली सूर्यवंशी यांचे पॅनल उभे होते.

 Shivsena MLA Kishore  Patil
Amalner Bazar Samiti Election : अमळनेरमध्ये सत्तांतर ; राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांकडून तीन माजी आमदारांना धोबीपछाड

अमळनेरमध्ये आघाडीचाच बोलबाला

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लागलेल्या निकालात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने ११ जागा पटकावल्या आहेत. दुसरीकडे तीन माजी आमदार यांच्या नेतृत्वाखालीअसलेल्या भाजपच्या पॅनलला धोबीपछाड मिळाली आहे. याठिकाणी भजपला माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. आमदार अनिल पाटील यांच्यासह, भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com