जयकुमार रावल ७ हजार कोटींची गुंतवणूक आणणार!

आमदार जयकुमार रावल यांनी चार प्रकल्पांकडून पसंतीचा दावा केला.
Ex Minister Jaykumar Rawal
Ex Minister Jaykumar RawalSarkarnama

धुळे : नरडाणा (ता. शिंदखेडा) (Dhule) क्षेत्रातील बाभळे फाट्याजवळील एमआयडीसीला विविध सोयीसुविधांमुळे देशातील उद्योजकांकडून (Industries) पसंती दिली आहे. आगामी पाच वर्षांत या एमआयडीसीत सुमारे पाच ते सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठा वाव मिळेल असा दावा भाजप नेते, आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी केला.

Ex Minister Jaykumar Rawal
राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांचा अल्टीमेटम मागे घेतील?

आमदार रावल म्हणाले, की नरडाणा एमआयडीसीत नामांकित अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे तीन प्लाँट येत आहे. यासंबंधी प्रक्रिया कंपनीने सुरू केली आहे. याशिवाय केमिकल प्लांट आणि अन्य दोन प्रकल्पही लवकर एमआयडीसीत गुंतवणूक करत आहेत. सद्यःस्थितीत एमआयडीसीत सुमारे दोन हजार कोटींची गुंतवणूक झाली असून, त्यामुळे प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष शेकडो हातांना रोजगार मिळत आहे. या स्थितीमुळे आगामी पाच वर्षांत या एमआयडीसीत पाच ते सात हजार कोटींची गुंतवणूक होईल, असा विश्‍वास आहे.

Ex Minister Jaykumar Rawal
नितीन गडकरींनी जळगाव महापालिकेची बेअब्रु का केली?

दोनशे किमीवर बाजरपेठा

नरडाणा एमआयडीसीबाबत ७५०.०९ हेक्टरवर क्षेत्र विकासाचे नियोजन आहे. आतापर्यंत एमआयडीसीने ६४८.५६ हेक्टरवर ताबा घेतला आहे. सिंचन विभागाने प्रती वर्ष ४.३८ एमएम३ पाणी आरक्षणास मंजुरी दिली आहे. या एमआयडीसीत रस्ते, मुबलक पाणी, वीजेची सुविधा आहे. तसेच एमआयडीसीपासून नाशिक, इंदूर, सुरत प्रत्येकी दोनशे किलोमीटरवर आहे.

मुंबईही जवळ आहे. या ठिकाणच्या बाजारपेठा नरडाणा एमआयडीसीमुळे जवळ आल्या आहेत. या लोकेशन ॲडव्हान्टेजमुळे देशातील उद्योजक या एमआयडीसीत गुंतवणुकीला पसंती देत आहेत. शिंदखेडा- दोंडाईचा, शिरपूर क्षेत्रातील शैक्षणिक सुविधांमुळे जसे अभियांत्रिकी महाविद्यालय, पॉलिटेक्निक, आयटीआयमुळे वर्षाला सरासरी हजार ते दीड हजार अभियंते घडतात. तसेच नरडाणा एमआयडीसीसाठी लागणारे कुशल- अकुशल कामगार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. जमिनीची उपलब्धता आहे. त्यामुळे या एमआयडीसीव्दारे रोजगारनिर्मितीला वाव मिळत आहे, असे आमदार रावल यांनी नमूद केले.

आंदोलनामुळे चालना मिळाली

काही जमिनी काही प्रकल्पांनी अडकवून ठेवल्या. मात्र, त्यांनी प्रकल्प उभारले नाहीत. त्यामुळे दहा ते बारा वर्षांपूर्वी मी पुढाकार घेत प्रकल्प उभारा, अन्यथा जागा रिकामी करा, असे आंदोलन केले होते. त्याचा परिणाम नरडाणा एमआयडीसीच्या विकासाला चालना मिळाली, असे सांगत आमदार रावल यांनी या औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योजक, कामगारांना सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ती नेटाने पार पाडली तर आगामी काळात गुंतवणूक वाढून बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न लवकर सुटू शकेल, असेही ते म्हणाले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com