MLA Hiraman Khoskar
MLA Hiraman KhoskarSarkarnama

आमदार हिरामण खोसकरांनी शिकवला तीन अभियंत्यांना चांगलाच धडा!

जिल्हा परिषदेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना प्रशासनाने बजावली कारणे दाखवा नोटिस.

नाशिक : जिल्हा परिषदेतील (Nashik ZP) बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंत्यांविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभाग क्रमांक एक, दोन व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना (Ex. Engineers) कारणे दाखवा नोटिसा (Show cause notice) बजावल्या आहेत. (Administration issue a show cause notice in Hiraman Khoskar constituency works)

MLA Hiraman Khoskar
`त्या` अभियंत्यांच्या प्रतापाने संयमी नरहरी झिरवाळ संतापले!

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, (Narhari Zirwal) आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी जिल्हा नियोजन विभागाकडे आदिवासीतंर्गत डोंगरी विकासकामांबाबत विचारणा केली आहे. नियोजन विभागाने जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठवत यासंदर्भात विचारणा केली. त्यानुसार या कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा बजावल्याचे बोलले जात आहे.

MLA Hiraman Khoskar
भाजप कार्यकर्ते म्हणतात,`आम्हाला उमेदवारी मिळेल की नाही`

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी शासनाकडून विविध विकासकामांसाठी निधी मिळवला होता. मात्र प्रशासनाने त्यात अडथळा आणल्याने आमदार खोसकर चांगलेच संतापले आहेत.

ग्रामविकास विभागाने मार्च २०२२ मध्ये लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सुचविलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. आदिवासी उपाययोजनेंतर्गत डोंगरी विकास कार्यक्रमांतंर्गतही कोट्यवधींचा निधी मंजूर केला होता. आमदार झिरवाळ, खोसकर, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आदींच्या मतदारसंघाततील काम या निधीतून करण्यात येणार असल्याने यातील काही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात यावीत, यासाठी अंदादपत्रक करून संबंधित ठेकेदारांना कामांच्या शिफारशीही देण्यात आल्या नाहीत.

मात्र, या कामांचे कार्यारंभ आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून वेळेत दिले गेले नसल्याने कामे रद्द झाली आहेत, अशी सुमारे कोट्यवधींची कामे आहेत. याबाबत या लोकप्रतिनिधींनी तक्रार केली आहे. त्यानुसार नियोजन विभागाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठवून विचारणा केली आहे.

या पत्रानुसार प्रशासनाने बांधकाम विभाग एक, दोनच्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावली आहे. याबाबत सात दिवसांत खुलासा मागविला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासही नोटीस देण्यात आली आहे. त्यांना नेमकी नोटीस का बजाविण्यात आली, याबाबत माहिती समजू शकली नाही.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com