काँग्रेसच्या हिरामण खोसकरांची घोषणा, `गाव तिथे आमदार निधी उपलब्ध करू`
Hiraman KhoskarSarkarnama

काँग्रेसच्या हिरामण खोसकरांची घोषणा, `गाव तिथे आमदार निधी उपलब्ध करू`

आमदार हिरामण खोसकर यांच्या कामांचा धडाका सुरूच.

घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जनतेने विकास कामांच्या माध्यमातूनच माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आमदार होण्याची संधी दिली. गटात येत्ययाकाही दिवसात विविध विकासकामांना सुरवात होणार आहे. काम करणाऱ्या माणसाला जनता विसरत नाही हा अनुभव मला आलेला आहे. गाव तिथं आमदार निधी उपलब्ध करून देण्याचे काम मी करणार असल्याचे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी केले.

Hiraman Khoskar
महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’

आपल्या आक्रमक कामकाजाच्या शैलीने चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्या कामकाजाच्या प्रेमात पडलेले अनेक कार्यकर्ते आहेत. त्यातून काँग्रेसचा विस्तार अशा कामकाजाने स्थानिक तसेच पक्षाच्या नेत्यांतही लोकप्रिय ठरले आहेत. आता आमदार खोसकर यांच्या नव्या घोषणेने मतदारांवर गारूड टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक गावात आमदार निधी देणार असल्याची घोषणा केली आहे.

Hiraman Khoskar
धुळे बँक निवडणूक: शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी विजयी

वाघेरे (ता. इगतपुरी) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले, त्याप्रसंगी आमदार खोसकर बोलत होते. जिल्हहापरिषद सदस्य उदय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

वाघेरे येथे मूलभूत सुविधा योजनेंतर्गत आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून २० लाख रुपये किंमतीचे सभामंडप व जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांच्या सेस निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांमुळे नागरी जीवन सुसह्य होणार आहे. यापुढी काणलात प्रत्येक गावात आमदार निधीतून कामे करणार असल्याचेही श्री. खोसकर यांनी सांगितले.

यावेळी सरपंच मीनाबाई भोर, मोहन भोर, तानाजी भोर, विजय भोर, ज्योती भोर, शिवाजी गायकर, धनराज भोर, बाळू चांदेरे, रामभाऊ गायकर, कुंडलिक भोसले, बबन आंबेकर, किसन भोर, विष्णू भोर, संतोष भोर, दर्शन भोर, बाळू भोर, बाळासाहेब धांडे, गणेश पांडे, बंडू भोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

---

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in