
Old Pension Scheme News : नोव्हेंबर २००५ पूर्वी नोकरीस लागलेल्या शिक्षकांना त्यावेळी शासनाने संबंधित शाळांना अनुदान दिले नाही. त्यामुळे शिक्षकांना पेन्शन लागू झाली नाही. शिक्षकांवर त्यामुळे अन्याय झाल्याचे कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले.
शहादा येथील तालुका एज्युकेशन संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयात नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ व एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त जुनी पेन्शन कृती समितीच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी म्हात्रे बोलत होते.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू (Old Pension Scheme) करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तत्त्वतः मंजुरी दिल्याचेही म्हात्रे म्हणाले. अभ्यासाअंती शिक्षकांना जुनी पेन्शन देणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे म्हात्रे यांनी शहादा येथे शुक्रवारी सांगितले.
या वेळी म्हात्रे म्हणाले, ''१ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न, अनुदान, वाढीव पदे, अतिरिक्त शिक्षक यांसह विविध प्रश्नांची मांडणी सातत्याने सभागृहात करणार आहे. इतर राज्यांत लागू केलेली जुनी पेन्शन योजना अद्यापही कागदावर आहे. केंद्राने परवानगी दिली नसल्याचे'' त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, संचमान्यता या प्रश्नासंबंधीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुराव सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडश्रेणी ही फक्त २० टक्के लोकांना मिळते, तसेच आश्वासित प्रगत योजना लागू करण्यासंबंधी प्रश्नही रेटून धरला. १९०१ च्या प्रश्नासंबंधी ही पाठपुरावा असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ज्या जमिनीवर शाळा सुरू आहे ती नावावर नाही, तिला अनधिकृत न करता नाममात्र फी घेऊन तिला कायम करण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकांना पेन्शन मिळावे यासाठी मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर उपोषण झाले. अनेक संघटना एकत्रित झाल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना प्रत्यक्ष भेटून जुन्या पेन्शन योजनेसंबंधी बारकावे लक्षात आणून दिले आहेत. त्या वेळी त्यांनी सगळ्या बाबी समजून लवकरात लवकर संबंधित कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना पदरात पडेल, असे आश्वासन दिल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले.
या बैठकीला तालुका संस्थेचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, जयदेव पाटील, जे. के. पाटील, गणेश पाटील, जी. एन. पाटील, लक्ष्मीकांत पाटील, एल. एच. चौधरी, जगदीश पाटील, किरण पाटील, अमोल पाटील, दिनेश पाटील, किरण सोनवणे, आदी उपस्थित होते.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.