Dhule news: आमदार फारूक शाह यांनी बंद पथदिव्यांचे लोकार्पण केले

भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन यांचे आमदार फारूक शाह यांच्यावर टिकास्त्र
BJP corporator Harhkumar relan
BJP corporator Harhkumar relanSarkarnama

धुळे : शहराचे (Dhuel) आमदार फारूक शाह (Farukh Shah) साक्री रोडवरील पथदिव्यांसंबंधी निधीबाबत दिशाभूल करीत आहेत. त्यांचा ३७ लाखांच्या निधीशी संबंध काय? भाजपचे (BJP) तत्कालीन आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी हा निधी आणला होता. मी पाठपुरावा करून पथदिवे लावून घेतले. मात्र, बंद पथदिव्यांच्या लोकार्पणातून श्रेयासाठी आमदार शाह यांची दिसणारी केविलवाणी धडपड केवळ हास्यास्पद असल्याची टिका भाजपचे नगरसेवक हर्षकुमार रेलन (Harshkumar Relan) यांनी केली. (Farukh Shah try to take credit of my devolopment)

BJP corporator Harhkumar relan
Shivsena: एक गुलाबराव गेला, पण माझ्याकडे गुलाबाची बाग आहे!

आमदार शाह यांनी साक्री रोडवरील पथदिव्यांच्या कामाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण केले. यासंबंधी निधी व कामाबाबत कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक सातमधील भाजपचे नगरसेवक रेलन म्हणाले, आमदार शाह यांना श्रेय हवे होते ना, मी दिले असते.

BJP corporator Harhkumar relan
Shivsena : अकोल्यात ठाकरेंना मोठा धक्का; शिंदे गटाची नवीन कार्यकारिणी जाहीर

त्यांच्या हस्ते लोकार्पण केले असते. परंतु, बंद पथदिव्यांचे लोकार्पण करून त्यांनी काय साध्य केले? यात त्यांनी स्वतःचे हसू करून घेतले. माझ्या प्रभागात २० कोटींच्या निधीतून विकास कामे केली आहेत. आमदारांनी माझ्या प्रभागात यावे आणि विकास कामे पहावीत, आमदार शाह गटारी करू शकत नाही, ते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, मोती नाल्यापासून ते मनोहर हॉस्पिटलपर्यंतच्या साक्री रोडचे रुंदीकरण, पथदिवे यासाठीचा निधी अनिल गोटे यांना मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. रस्त्याचे काम गोटे यांच्या कार्यकाळातच झाले. मग पथदिवे का नाहीत, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला.

ते पुढे म्हणाले, याबाबत तांत्रिक पूर्ततेनंतर ३७ लाखांचा निधी मनपाकडे वर्ग करून घेतला. मग काम पूर्ण झाले. अशात चाचणीनंतर पथदिव्यांचे लोकार्पण करेल, असे जाहीर केले. परंतु, श्रेयाच्या नादात आमदार शाह यांनी घिसाडघाईत लोकार्पण उरकले, अशी टिका नगरसेवक रेलन यांनी केली. नगरसेविका किरण कुलेवार, कशिश उदासी उपस्थित होत्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com