..मग मंत्रीपदासाठी भांडणे का ? एकनाथ खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल

शिवसेना सोडण्याच्या कारणांबाबत त्यांचे कुठेही एकमत दिसलेले नाही.
 Eknath Khadse
Eknath Khadse sarkarnama

जळगाव : "शिवसेनेने हिंदुत्वा मुद्या सोडला त्यामुळे आम्ही त्या मुद्यावर आम्ही एकत्र आलो आहोत, असा दावा बंडखोर आमदारांनी केला आहे. जर त्यांचा हिदुत्वाचाच मुद्या आहे तर मग आता मंत्रीपदासाठी हेच आमदार भांडणे का करीत आहे," असा सणसणीत टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बंडखोर आमदारांना (rebel MLA) लगावला आहे. (Eknath Khadse news update)

जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले,"मूळामध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर बाहेर पडून त्यांनी भाजपशी युती केली, कि उध्दव ठाकरे यांच्यावरील नाराजीमुळे पक्ष सोडला. आमची विकास कामे होत नाहीत म्हणून आम्ही बाहेर पडतो आहोत असे सागंण्यात आले. अशी वेगवेगळी कारणे प्रत्येक आमदाराकडून सांगण्यात आली. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या कारणाबाबत कुठेही एकमत दिसलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्या महत्वाचा मानला तर आता या बंडखोर आमदारांनी मंत्रीमंडळात आम्हाला घ्या हे सांगण्याची काही गरजच नाही,"

हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असले पाहिजे.

"हिंदुत्वावर आले ना, मग हिंदुत्व हेच तुमचे ध्येय असले पाहिजे. मग त्यासाठी मंत्री कशाला व्हायला पाहिजे. त्यामुळे या बंडखोराचा हिंदुत्व हा केवळ सांगण्यासारखा प्रकार दिसतो आहे. त्यांचे पक्षातून बाहेर पडण्याचे अनेक वेगवेगळे मुद्ये असल्याने त्यांच्या कोणतेही एकमत नसल्याचे दिसत आहे. आता त्यांनी पक्षातून बाहेर पडल्याचे कारण सांगतांना एकमत करण्याची गरज आहे," असे खडसे म्हणाले.

हे प्रश्‍न अत्यंत भावनिक

राज्यातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना दिलेल्या स्थगितीबाबत बोलतांना खडसे म्हणाले, "कोणतेही नवीन सरकार आले तर ते जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देते. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास दिलेली स्थागिती दिलेली तात्पुरती असावी असे मला वाटते. कारण हे प्रश्‍न अत्यंत भावनिक असतात.त्यामुळे हे निर्णय सरकारला परत घ्यावे लागतील, असे माझे मत आहे. मात्र जर विकास कामांना स्थगिती देवून ते रद्द केले तर सार्वजनिक कामे थांबतील व जनतेचे फार मोठे नुकसान होईल,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com