आमदार दिलीप बनकरांनी रानवड कारखाना सुरु करीत शब्द पाळला!

रानवड (ता. निफाड) सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम काल सुरु झाला.
MLA Deelip Bankar at Ranwad sugar factory programme
MLA Deelip Bankar at Ranwad sugar factory programmeSarkarnama

पिंपळगाव बसवंत : आमदार दिलीप बनकर (MLA Deelip Bankar) यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द खरा करत पतंसस्थेच्या माध्यमातून रानवड साखर कारखाना (Ranwad Suagar Factory) सुरु केला. रविवारी या कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरवात झाली.

MLA Deelip Bankar at Ranwad sugar factory programme
महाविकास आघाडीपुढे गिरीश महाजन हतबल; होम ग्राऊंडमध्ये उमेदवारही मिळाले नाही!

यावेळी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे घरपोच देऊन न्याय देणार आहे. अनेक अडथळ्याची शर्यत पार करून रासाका कार्यान्वित होत असून शब्दपूर्ती करून मी कर्तव्य निभावत आहे असे आमदार दिलीप बनकर यांनी यावेळी सांगितले. `रासाका`च्या ३९ व्या गळीत हंगामाच्या अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, पिंपळगाव बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते प्रमुख उपस्थित होते.

MLA Deelip Bankar at Ranwad sugar factory programme
संजय राऊत म्हणाले, तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसले नसते!

यावेळी आमदार बनकर म्हणाले, दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत रासाका सुरू करण्याचे आश्‍वासन हे निवडणूक स्टंट नव्हते, तर ऊस उत्पादकांची व्यथा सोडवणारे होते. कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्यासह अनेक धुरिणांच्या दूरदुष्टीतून उभ्या राहिलेल्या रासाकाची भग्नावस्था मनाला चटका लावणारी होती. स्व. बनकर पतसंस्थेने ४० कोटी रूपये गुंतवणूक करून शेतकरी व कामगाराच्या आयुष्यात पुन्हा सुखाची दिवाळी व्हावी यासाठी रासाका सुरू करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे.

तीन लाख टन ऊसाचे गाळप

रासाकामध्ये ज्युस्ट, इथेनॉल, डिस्टलरी या उपउत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. येत्या हंगामात तीन लाख टन ऊसाचे गाळप होईल. शासनाला पाच कोटी रूपये भाडे द्यावे लागणार असून शेतकऱ्यांच्या ऊसाला समाधानकारक दर देणार आहे. लवकरच अडीच हजार टनांपर्यत क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले जाईल. रासाका परिसरातील रस्ते शासनाच्या माध्यमातून विकसित करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून वर्षभरात या परिसराचे नंदनवन करणार असल्याचे आमदार बनकर यांनी स्पष्ट केले.

आमदार पदाच्या व्दिवर्षपुर्तीचा मुहुर्त त्यांनी रानवड कारखाना सुरू करून सादला. निवडणुकीच्या प्रचारसभेत दिलेले आश्‍वासन त्यांनी पूर्ण केले. तब्बल सात वर्षानंतर सायरन वाजवत रासाकाचे अग्नीप्रदीपन झाले. २४ ऑक्टोबर २०१९ ला ते आमदार झाले. त्याचा व्दिवर्षपुर्तीचा मुहुर्त रासाका कार्यान्वीत झाला.

यावेळी `मविप्र` संस्थेचे माजी संचालक विश्‍वासराव मोरे, पिंपळगाव बाजार समितीचे माजी संचालक विलास बोरस्ते, दत्तात्रय डुकरे, सुरेश खोडे, भाऊसाहेब भवर, नामदेव शिंदे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com