Bazar Samiti Election: पारोळ्यात चिमणराव पाटलांच्या हातातून सत्ता जाणार ? ; सतीश पाटलांची कसोटी..

Parola Bazar Samiti Election : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वर्चस्वाची कसोटी आहे.
MLA Chimanrao Patil
MLA Chimanrao PatilSarkarnama

Parola Bazar Samiti Election: जळगाव जिल्ह्यातील पारोळा बाजार समिती संचालक निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत, १८ पैकी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडीने आपली ताकद दाखविली आहे.

पारोळा बाजार समितीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या वर्चस्वाची कसोटी आहे. मतमोजणीच्या प्रारंभी तब्बल १५ जागावर महाविकास आघाडी आघाडीवर आहे.

विकास सोसायटी, ग्रामपंचायत, हमाल मापाडी मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत. अद्याप मतमोजणी सुरू आहे, या बाजार समितीवर गेल्या अकरा वर्षापासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांची सत्ता होती, विशेष म्हणजे बिनविरोध निवडून येत होते. यावेळी प्रथमच निवडणूक झाली आता परिवर्तन होण्याच्या दिशेने कौल दिसून येत असल्याचे चित्र आहे.

MLA Chimanrao Patil
Bazar Samiti Election : बाजार समितीच्या निवडणुकीत १४ ठिकाणी आघाडीचे वर्चस्व ; सत्ताधाऱ्यांना धक्का

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. प्रारंभीच्या निकालात महाविकास आघाडी आठ तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत.

MLA Chimanrao Patil
Raver APMC Election Results : रावेर बाजार समितीत 'मविआ'ची आघाडी ; आठ जागा पटकाविल्या..

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या सर्व 18 जागांचे निकाल हाती आले असून 18 पैकी 18 जागांवर आमदार यशोमती ठाकूर गटाचा विजय झाला आहे, यामुळे तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि प्रहारचा धुव्वा उडाला आहे. या विजयानंतर तिवस्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. तिवसा बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना एका बाजूला तर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट, बच्चू कडू यांची प्रहार यांनी निवडणूक लढवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com