
सावदा : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारांना मानून सर्व जनतेने चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांना मतदान करून निवडून आणले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी शरद पवारांसह पक्षासोबत गद्दारी (Betrayal) केली आहे, अशा शब्दांत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.
कोचूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा, स्वर्गरथ लोकार्पण व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी यावेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, विनोद तराळ, किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील होते. या कार्यक्रमात श्री. खडसे बोलत होते.
यावेळी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक रहायला हवे होते. त्यांना लोकांनी या पक्षामुळेच मतदान केलेले आहे. मात्र त्यांना सध्या वेगळ्याच राजकारणाचा मोह झालेला दिसतोय. मतदार यांना योग्य वेळी त्याची जाणीव करून देतील.
श्री. खडसे म्हणाले, की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन होईल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. अगदी देवेंद्र फडणवीस यांनाही असे वाटले नव्हते, म्हणून ते वारंवार सांगत होते ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल’. मात्र, त्यांना थांबविण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. राज ठाकरे यांचा भोंगाही फूस झाला आहे.
यावेळी प्रगतिशील शेतकरी संजय पाटील व सुनील पाटील यांनी खडसे यांचे स्वागत केले. तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, हारून शेख, रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक जगदीश बढे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, दीपक पाटील, हारून शेख, राजेश कोल्हे, प्रकाश पाटील, हेमराज पाटील, मधुकर पाटील, कमलाकर पाटील, कोचूरचे सरपंच भगवान आढाळे, संजय पाटील, सुनील पाटील, गंप्पा पाटील, योगेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
----
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.