मंत्र्यांची यादी तयार, २९ जुलैला मंत्रीमंडळ विस्तार?

शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे दावा केला.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार येत्या २९ जुलैला होणार आहे. मंत्र्यांची यादी तयार आहे. मुख्यमंत्री कोल्हापूरच्या (Kolhapur) दौऱ्यावरून परतल्यावर याबाबतचा निर्णय घेतील, असा दावा बंडखोर आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केला. (People have curisity about cabinet expansion of Eknath Shinde)

Abdul Sattar
फक्त चर्चेनेच सुरु झाला लताबाई सोनवणे यांच्या मंत्रीपदाला विरोध!

श्री. सत्तार औरंगाबाद येथे विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र आता कोणीही बंडखोर परतण्याची शक्यता नाही. आम्ही परतायचे नाही हे निश्चित केले आहे. येत्या ३१ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे मोठे शक्तीप्रदर्सन होईल, असा दावा त्यांनी केला.

Abdul Sattar
नाशिकच्या बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळ देणार

शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, राज्यातील जनतेला मंत्रीमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. लोकांना लवकरात लवकर मंत्रीमंडळ विस्तार व्हावा असे वाटते. याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील जाणीव आहे.

ते म्हणाले. सबंध महाराष्ट्राचा गाडा हाकायचा म्हणजे मंत्रीमंडळ लागले. अगदी गावगाड्यापासून तर शेतमजूरांच्या, गोर-गरीबांच्या दलीतांच्या पिडीतांच्या अनेक घटकांसह अनेकांच्या समस्या मंत्रालयाच्या माध्यमातून सोडविल्या जातात. त्यामुळे लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in