हसन मुश्रीफ यांनी नाक दाबल्याने धुळ्याचे भाजप नेते कासावीस!

‘निधी’च्या स्थगिती प्रकरणी महसूल आयुक्तांकडे चौकशी
हसन मुश्रीफ यांनी नाक दाबल्याने धुळ्याचे भाजप नेते कासावीस!
Hassan MushrifSarkarnama

धुळे : येथील (Dhule) जिल्हा परिषदेअंतर्गत (ZP) दोन वर्षांत वेगवेगळ्या विभागांच्या विकास कामांच्या नियोजनासाठी करण्यात आलेल्या निधीसंबंधी ठरावांना स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी तात्पुरता स्थगिती देण्यात येत असल्याचे निर्देश दिले. (Hassan mushrif ordered to stop funds of BJP leaders work)

Hassan Mushrif
काँग्रेस नेत्यांचा इशारा... तर अभियंत्यांची झोपमोड करू!

त्यानुसार नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी आणि सविस्तर अहवाल सादर करावा, असा आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिला आहे.

Hassan Mushrif
आमदार दिलीप बनकर यांची घरच्या मैदानावरच दमछाक!

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपतर्फे विरोधी गटातील कापडणे, मुकटी गटात विविध विभागांमार्फत विकास निधी दिला जात नाही. या अन्यायामुळे २०२० ते २०२२ या कालावधीतील निधीबाबत सर्व मंजूर ठरावांना स्थगिती द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्याकडून झाली. त्यावर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी येथील जिल्हा परिषदेतील दोन वर्षातील मंजूर ठरावांना स्थगिती देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.

मात्र, ग्रामविकास मंत्रालयातील कार्यासन अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक, गटनिहाय निधी वाटपाचा, रस्तेविषयक कामांबाबत अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले. त्यामुळे मंत्र्यांच्या आदेशाबाबत संभ्रमावस्था असून स्थगिती दिल्याचे स्पष्ट होत नाही. परिणामी, निधीबाबत रूटींगप्रमाणे कामकाज सुरू असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.

ग्रामविकास मंत्रालयाने नाशिक विभागीय महसूल आयुक्तांना पत्र दिले. त्यात नमूद आहे, की श्री. पाटील, श्री. शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, नाशिक विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश निर्गमित करावे. त्याप्रमाणे आयुक्तांनी मंत्र्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करून शासनास तत्काळ अहवाल सादर करावा, असे उपसचिव प्रवीण जैन यांनी म्हटले आहे.

या स्थितीमुळे मंत्र्यांच्या आदेशाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून निर्माण करण्यात आलेली संभ्रमावस्था दूर झाल्याचे मानले जाते. तसेच निधीच्या वाटपावरून सत्ताधारी भाजप व विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे चित्र ठळक झाले आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in