मंत्री गुलाबराव पाटलांची जीभ घसरली;स्त्रीरोग तज्ञ कधीही...

Gulabrao patil| गुलाबराव पाटील यांनी यापुर्वीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.
Gulabrao patil|
Gulabrao patil|

जळगाव: “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं विधान राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमात केलं आहे. त्यांच्या या विधानावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

जळगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना डॉक्टर आणि मंत्र्यांमधील फरक सांगताना त्यांनी विधान केलं आहे. “एक हजार लोकांची ओपीडी होती. त्याचा निकाल आठ ते दहा असा दोन तासात लावला. आम्हा मंत्र्यांपेक्षा डॉक्टर तरी बरे. जनरल फिजिशियन, आर्थोपेडिक, हृयदरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ. स्त्रीरोग तज्ञ असतात. पण स्त्रीरोग तज्ञ कधी हात-पाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही. ” असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी भाषणात केलं आहे.

Gulabrao patil|
Supriya Sule : बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे, निर्मला सीतारामन यांचे मी स्वागत करेन !

“आम्ही तर जनरल फिजिशियन आहोत. ज्याची बायको नांदत नाही तो माणूसपण आमच्याकडे येतो. मंत्र्यांचं एकटं डोकं असतं तर डॉक्टरांचं एकाच फॅकल्टीचं डोकं असतं. मात्र आमचं डोकं असं असतं की इतके लोक आमच्याकडे वेगवेगळ्या समस्या घेऊन येत असतात आणि आम्ही ऐकणारे एकटे असतो. आम्ही त्यांना समजावून त्यांची काम करतो. एवढं करुन पण जर अजून नवीन कोणी आलं तर एवढे फ्रेश असतो की त्याला पहिले आपणच आलो आहोत असं त्याला वाटलं पाहिजे.” असंही म्हटलं.

गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून तज्ज्ञ डॉक्टरांपेक्षा जनरल फिजिशियन्सकडे समस्या घेऊन जाणारे लोक जास्त असतात, असं सांगत मंत्री आणि डॉक्टरांच्या कामाची तुलना केली आहे. मंत्री हे जनरल फिजिशियन्ससारखे असतात, असं गुलाबराव यांनी डॉक्टरांचा संदर्भ देत सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

गुलाबराव पाटील यांनी यापुर्वीही अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ''आपल्या मतदारसंघात आपण खूप चांगले रस्ते केल्याचे सांगत त्यांनी जळगावातील रस्त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाची उपमा दिली होती. एकनाथ खडसे गेली 30 वर्षे या भागातील आमदार असूनही ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. पण माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत", असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in