Gulabrao Patil Statement: ''बावनकुळेंच्या विधानाला आम्ही महत्व देत नाही,कारण..''; मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं विधान

Jalgaon Politics News: आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला...
Gulabrao Patil  & Chandrashekhar Bawankule
Gulabrao Patil & Chandrashekhar Bawankule Sarkarnama

Gulabrao Patil On Chandrashekhar Bawankule : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात गोष्ट वेगळी होती. आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला. अमित शाह यांनी सांगितले होते. एक वेळ आम्ही सत्तेतून बाजूला राहू, मात्र विश्वासघात सहन करणार नाही. असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट पडसाद उमटत आहे. याचवेळी शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी बावनकुळेंच्या विधानाला आम्ही महत्व देत नसल्याचं म्हटलं आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील( Gulabrao Patil) यांनी जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य केलं आहे. पाटील म्हणाले,चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याला मी महत्त्व देत नाही. कारण तो त्यांचा स्पेसिफिक विचार आहे. ते भाजपचे नेते आहेत. आम्ही फक्त जी प्रॉपर युती होती, त्या युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न केला असं गुलाबराव पाटील म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासघाताचा बदला घेतला या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी हे विधान केलं आहे.

Gulabrao Patil  & Chandrashekhar Bawankule
Nitin Deshmukh News : अकोल्यातील पाणीप्रश्न पुन्हा तापणार;ठाकरे गटाचा नेता फडणवीसांच्या घरापर्यंत पदयात्रा काढणार

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वज्रमूठ सभेतील गैरहजेरीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठी खुर्ची होती. त्यांचा राजेशाही थाट होता. या सभेत सोनिया गांधींचे फोटो नव्हते. यावेळी नाना पटोले यांना माहीत असेल की, माझी खुर्ची लहान ठेवली आहे. म्हणून ते गेले नसावे असं विधान केलं होतं.

आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला...

बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात गोष्ट वेगळी होती. आम्ही विश्वासघाताचा बदला घेतला. अमित शाह यांनी सांगितले होते. एक वेळ आम्ही सत्तेतून बाजूला राहू, मात्र विश्वासघात सहन करणार नाही. लाखोंचा जनसमुदाय बाळासाहेबांच्या मागे होता, असे बावनकुळे पुढे म्हणाले.

Gulabrao Patil  & Chandrashekhar Bawankule
Nagpur News : नितीन गडकरी बिनधास्त पण नाना पटोलेंचे असणार कडवे आव्हान; असे असेल गणित!

शंभर जन्म जरी उद्धव ठाकरे यांनी घेतले तरी...

बाळासाहेब ठाकरे यांचा एक विचार होता. आम्हाला त्यांचा सन्मान होता. उद्धव ठाकरे फक्त त्यांचे मुलगे होते. शंभर जन्म जरी उद्धव ठाकरे यांनी घेतले तरी ते हे बाळासाहेब ठाकरे होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांना भ्रष्टाचार बद्दल बोलण्याचा अधिकार नाही. भ्रष्ट लोकांसोबत तुम्ही बसले आहे. अनेक प्रकरण आहे जे समोर येतील, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com