Dr. Vijaykumar Gavit: मंत्री डॉ. गावित यांच्या स्वागतासाठी नंदनगरीत तरुणाई थिरकली

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची नंदुरबार येथे मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
Dr. Vijaykumar Gavit
Dr. Vijaykumar GavitSarkarnama

नंदुरबार : राज्याचा मंत्रिमंडळात डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर आज प्रथमच त्यांचे नंदुरबार (Nandurbar) शहरात आगमन झाले. शहरात त्यांचे आगमन होताच घोषणांसह ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. (Dr. Vijaykumar Gavit recives Grand wel come in Nadurbar)

Dr. Vijaykumar Gavit
Raksha Khadse: केळी उत्पादकांना रेल्वे प्रशासनाने भरपाई द्यावी

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात नंदुरबार येथील भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश झाला. मंत्रिमंडळातील समावेशानंतर शुक्रवारी प्रथमच ते नंदुरबार शहरात दाखल झाले. मुंबई ते नंदुरबार प्रवासात त्यांचा ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. धुळे, दोंडाईचा मार्गे सत्कार स्वीकारत सांयकाळी पाचच्या सुमारास मंत्री डॉ. गावित यांचे नंदुरबार शहरात आगमन झाले.

Dr. Vijaykumar Gavit
Girish Mahajan: मंत्री झाल्यावर गिरीश महाजनांचे जल्लोषात स्वागत

धुळे रस्त्यावर शहराच्या सीमेवरच कार्यकर्त्यांनी दुपारपासून स्वागतासाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जथ्था शहरात येण्यास सकाळपासूनच सुरू झाला होता. त्यांच्या निवासस्थानापासून तर खोडाईमाता रस्त्यावर वाहनांची रीघ लागली होती. विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते यांनी आदिवासी पारंपारिक नृत्य पथक, ढोल ताशांचे पथक, डी.जे. आदी सज्ज ठेवले होते.

हजारो चाहत्यांचा जनसमुदायाने त्यांचे स्वागत करीत शहरातील मुख्य रस्त्यावरून सवाद्य स्वागत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक तरुण कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, नृत्य करीत जल्लोष केला. मोकळ्या कारवरून जनतेला अभिवादन करीत डॉ. गावित यांची स्वागत मिरवणुक तीन तास सुरू होती. यावेळी त्यांची खासदार कन्या डॉ. हीना गावित, जि. प. सदस्या डॉ. सुप्रिया गावित, भाजपचे युवा नेते डॉ. विक्रांत मोरे, लक्ष्मण माळी, सागर तांबोळी उपस्थित होते. रस्त्यात नागरिकांकडून सत्कार स्वीकारत, अभिवादन करीत डॉ. गावित हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निवास्थानी पोचले.

तेथे त्यांचे औक्षण करीत स्वागत करण्यात आले. निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत पदाधिकारी, कार्यकर्ते सत्कारासाठी गर्दी करून होते. डॉ. गावित यांना मिळालेल्या मंत्री पदामुळे जिल्ह्याचा विकासाला पुन्हा गती येईल, अशी अपेक्षा स्वागतासाठी आलेल्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com