Bazar Samiti News : बाजार समितीत मंत्री भुसेंचा पराभव; ठाकरेंच्या खेळीने पुढील राजकारणासाठी धोक्याची घंटा?

Dada Bhuse, Bazar Samiti News : नुकत्याच झालेल्या बाजार समितींच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना फटका बसला.
Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Dada Bhuse, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Market Committee Election : नुकत्याच झालेल्या बाजार समितींच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना फटका बसला. अनेक नेत्यांना आपल्या गडात पराभव स्विकारावा लागला. त्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या मालेगाव बाजार समितीमध्ये मंत्री दादा भुसे यांची अनेक वर्षांची सत्ता खालसा झाली. नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आलेल्या अद्वय हिरे यांनी त्यांचा पराभव केला.

बाजार समितीत झालेला हा पराभव भुसेंसाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. बाजार समितीमध्ये हिरे यांनी लढविलेल्या १५ पैकी १४ जागांवर यश मिळाले. तर दुसरीकडे सर्व १८ जागा लढविणाऱ्या भुसे गटाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. या गटास १५ जागांवर पराभव पत्कारावा लागला. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत हिरे यांनी समितीतले मागचे सर्व राजकीय हिशेब चुकते केले.

Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Sakri APMC News : साक्री बाजार समितीत भाजपने भाजप-शिंदे गटाचा धुव्वा उडवला!

ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे दादा भुसे हे शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे मालेगावमध्ये भुसेंना शह देण्यासाठी ठाकरेंनी भाजपच्या (BJP) अद्वय हिरे यांना गळाला लावले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिरे यांना ताकद देण्यासाठी मालेगावात सभा घेतली होती. महिन्याभरापूर्वी झालेल्या या सभेस मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाचा हुरुप वाढला होता. या सभेचाही फायदा त्यांना बाजार समितीमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडून आली. त्याची परिणिती यावेळची निवडणूक हिरे व भुजबळ समर्थकांनी एकत्र लढण्यात झाली आहे. हिरे गटाचा विजयाचा मार्ग सुकर होण्याचे हे ही एक प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. तसेच जिल्ह्यात (Nashik) शिंदे गटाकडे (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) हे दोन आमदार आहेत. मात्र, त्यांच्यात सख्य नव्हे तर राजकीय स्पर्धा आहे. त्यातून मालेगाव (Malegaon) बाजार समिती निवडणुकीतील भुसे यांच्या पराभवाला हातभार लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Dada Bhuse, Uddhav Thackeray News
Sakal-Saam TV Survey : पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा का? सकाळ-सामच्या सर्व्हेमध्ये समर्थक म्हणतात...

बाजार समितीतील दोन दशकातील सत्ता राखण्यासाठी भुसे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी अनेक डावपेच आखत हिरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तथापी सुरवातीलाच आमदार सुहास कांदे यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास असमर्थता दर्शविल्याने माशी शिंकली. यातून शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले.

बाजार समितीच्या कारभाराकडे भुसे यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. भुसेंच्या समर्थकांनीही एकमेकांचा हिशेब चुकता केला. ग्रामपंचायत गटात बहुमत असूनही झालेला पराभव भुसे गटाला जिव्हारी लागणारा आहे. हिरे यांनी शिवसेना प्रवेश केल्यापासून कार्यशैलीत मोठा बदल केला आहे. सामन्यांमध्ये मिसळत मोठेपणा बाजूला ठेऊन व सर्वांना सोबत घेण्याची त्यांची तयारी अनेकांना भावली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी सक्रिय झाली. यामुळे पुढील निवडणुकीमध्ये भुसे यांच्यासाठी धोक्याची घंडा असल्याची चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com