Dada Bhuse: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मंत्री भुसे थेट बांधावर !

कृषी विज्ञान संकुलातील शास्त्रज्ञांकडून ‘माझा एक दिवस- माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात शेतकरी बांधवाशी संवाद साधताना मंत्री दादा भुसे.
Minister Dada Bhuse with agreeculture Officers
Minister Dada Bhuse with agreeculture OfficersSarkarnama

संगमेश्‍वर : ‘माझा एक दिवस- माझ्या बळीराजासाठी’ (My one day for farmers) हा उपक्रम दहीदी (ता. मालेगाव) (Malegaon) या ठिकाणी संपूर्ण दिवस शेतकऱ्यांच्या सहवासात राबविण्यात आला. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (Minister Dada Bhuse discuss with agreeculture officers on scheme)

Minister Dada Bhuse with agreeculture Officers
Dhule News: भाजप म्हणते, साक्रीत ओला दुष्काळ जाहीर करा!‌

काष्टी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील कृषी विज्ञान संकुल, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी तंत्रनिकेतन अंतर्गत कार्यालय प्रमुख व शास्त्रज्ञांनी यात सहभाग घेतला. या वेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांबरोबर हितगुज करून शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद साधण्याचा, शेतकऱ्यांच्या समस्या तत्पर सोडविण्यासाठी मंत्री भुसे यांनी आवाहन केले.

Minister Dada Bhuse with agreeculture Officers
Dhule: धुळे महापालिकेच्या सभेत उर्दू घराच्या जागेवर वाद!

या उपक्रमाची रूपरेषा शेतकऱ्यांना विशद करण्यात आली. शेतकऱ्यांबरोबर शेतीविषयक चर्चासत्र घडवून आणले. या चर्चासत्रात पीक लागवड तंत्रज्ञान, पिकांवरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन, पिकांची विविध वाण, मा-ती पाणी परीक्षण, शेतीशी निगडित विविध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, फळ भाजीपाला प्रक्रिया उद्योग, विपणन यासंदर्भात शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर विविध पिकांना व ते आत्मसात करत असलेल्या विविध तंत्रज्ञानाची पाहणी केली. शेतावर प्रत्यक्ष शेतकरी व शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

या कार्यक्रमात कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्‍वनाथ शिंदे, शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, डॉ. दिनेश बिरारी, डॉ. सुरज गडाख, डॉ. पंकज सूर्यवंशी, डॉ. रितेश पाटील, डॉ. नंदलाल देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कृषि विभागाचे पर्यवेक्षक आर. के. अहिरे, दहिदीचे सरपंच सोपान वाघ यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in