Uday Samant News: प्रश्न विचारा मात्र, उत्तर ऐकायला सभागृहात थांबा!

Questions on Mumbai Schools - मुंबई शहरातील शाळांबाबतच्या क्लक्षवेधीवर सदस्य उपप्रश्न विचारू लागल्यावर सभापतींचाही पारा चढला
Anil Parab & Uday Samant
Anil Parab & Uday SamantSarkarnama

Nilam Gorhe News : मुंबई शहरातील झोपडपट्टीतील शाळांच्या प्रश्नावरील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान उपप्रश्न विचारण्यासाठी जणु स्पर्धाच लागल्याने सभापतींचा पारा चढला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी देखील `प्रश्न विचारा पण मग उत्तर ऐकण्यासाठी सभागृहात देखील थांबा`, असे सुनावले. (Many members trying to ask qustions in legislative assembly)

कपिल पाटील यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत मुंबईतील शाळांच्या (Mumbai) या प्रश्नावर मुंबई बाहेरचे अन्य सदस्य देखील उपप्रश्न विचारू लागल्यावर सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी कालापव्यय लक्षात घेऊन काही सदस्यांना फटकारले.

Anil Parab & Uday Samant
Journalist Issues : सभापती निलमताई गोऱ्हे महिला पत्रकारांसाठी धाऊन आल्या!

विधान परिषदेत आज दुपारचे सत्र साडे तीनला सुरू झाले. तेव्हा विविध लक्षवेधी आणि पुरवणी मागण्यांवरील चर्चा असा कार्यक्रम पटलावर होता. त्यात वेळेची कसरत करावी लागणार होती. मात्र कपिल पाटील यांच्या लक्षवेधीवरील चर्चा सुरू झाल्यावर खरे तर मुंबई शहराशी संबंधीत सदस्यांनीच चर्चेत भाग घ्यावा अशी अपेक्षा होती. मात्र विविध सदस्यांनी त्यावर उपप्रश्न विचारले.

मंत्री उदय सामंत यांनी या लक्षवेधीवर सकारात्मक उत्तर देत, मुंबई महापालिकेला याबाबत मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊन स्वनिधीतून महापालिकेने या शाळांना साह्य करावे. १०४ शाळांना १०० टक्के अनुदान देण्याची सूचना केली आहे. कोणत्याही शाळेली परवानगी रद्द होणार नाही, असे आश्वासन दिले.

Anil Parab & Uday Samant
Aditya Thackeray : आदित्य म्हणाले, चाळीस आमदारांचे चेहरे आता काळवंडले आहेत!

मात्र त्यानंतरही काही सदस्य उपप्रश्न विचारू लागल्यावर मात्र सभापती नीलमताई गोऱ्हे यांनी सभागृहाचे मतदान होऊ द्या, किती लक्षवेधींवर चर्चा करायची आणि किती वेळ कामकाज चालवायचे. सायंकाळी सहा वाजले की, सदस्य घड्याळाकडे पहायला लागतात. सकाळी साडे नऊला बोलावले तर कोणीच येत नाहीत. जे बोलतात, त्यांना मंत्र्यांची उत्तरे ऐकायलाही थांबायचे नसते, हे चालणार नाही, असे सुनावले.

Anil Parab & Uday Samant
Deepak Kesarkar यांच्यासोबत Anil Parab गोव्याला जाण्यास इच्छुक; बघा काय घडले? | Shivsena |Sarkarnama

या चर्चेनंतर मंत्री सामंत यांनी देखील सदस्यांना तुम्ही उपप्रश्न विचारा मात्र मग उत्तर ऐकायला सभागृहात देखील थांबा, असे सांगतिल्याने सभागृहाचा नुरच पालटला. त्यात शिवसेनेचे अनिल परब यांनी हस्तक्षेप केला. तुम्ही सर्व लक्षवेधील चर्चेला घ्या. पुरवणी मागण्यांवर देखील चर्चा होऊ द्या उशीर लागला तरी चालेल, मात्र महत्त्वाच्या लक्षवेधी असतात, त्या टाळू नका. त्यानंतर सर्व लक्षवेधींवर चर्चा करण्याचे ठरले. यावेळी अभिजीत वंजारी, विलास पोतनीस, सत्यजीत तांबे, सुनिल शिंदे अशा विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com