अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत

विखरणीच्या ग्रामसभेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्त्यव्याचा निषेध
Farmers at Yeola
Farmers at YeolaSarkarnama

नाशिक : सर्वत्र पावसाने (Heavy Rainfall) थैमान घातले असून, पिके पाण्यात (Crop loss due to water) सडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात कृषी मंत्री (Agreeculture minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रृ आहेत, अशी टिका पंचायत समितीचे गटनेते मोहन शेलार (Mohan Shelar) यांनी केली आहे. (Yeola Farmers warns agreeculture minister on wet Draught)

Farmers at Yeola
Girish Mahajan : यांची मोठी घोषणा : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्यांसाठी गुड न्यूज

विखरणी (ता. येवला) येथे ग्रामसभा झाली. त्यात ते म्हणाले, अतीवृष्टीने नुकसान झाले. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची काळजी करून शेतकऱ्यांच्या दुःख, वेदनांची दखल घेण्याची गरज आहे. मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना त्याचे काहीही घेण देण दिसत नाही. त्यामुळे वीजबिल आणि शेतसारा न भरण्याचा निर्णय विखरणी ग्रामस्थांनी घेतला आहे. असाच ठराव प्रत्येक गावकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन करावा. ही सुरवात आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही, तर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा डॉ. पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी दिला आहे.

Farmers at Yeola
Devendra Bhuyar : ..तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही ; देवेंद्र भुयारांचे वादग्रस्त विधान

रोज पडणाऱ्या पावसाने पिके पाण्यात तरंगतायं, अनेक पिके शेतातच सडली तरी शासन ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत आहे. शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी. जोपर्यंत दुष्काळ जाहीर होऊन भरपाई मिळत नाही तोपर्यंत शेतसारा व वीजबिल भरण्यात येणार नाही, असा ठराव विखरणी ग्रामसभेत करण्यात आला, तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नसल्याच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत गाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने दखल घ्यावी, यावर चर्चा झाली. मोहन शेलार यांनी कर न भरण्याचा ठराव मांडला. त्यास अशोक कोताडे यांनी अनुमोदन दिले. या ठरावाची प्रत तलाठी अमृता घुशींगे व कृषी सहाय्यक सुनीता कडनोर यांना प्रातिनिधिक स्वरूपात माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, सरपंच मीना पगार, उपसरपंच श्रावण वाघमोडे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आले.

शासनाने प्रधानमंत्री पीकविमा शासकीय यंत्रणेच्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना विमा भरण्यास भाग पाडले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून विखरणी गाव व परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, तर अनेक वेळेस ढगफुटीसदृश्य पाऊसही झाला आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांची पूर्ण नासाडी झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे.

शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी संबधित विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता, आम्हाला तसे कोणतेच आदेश व सूचना नसल्याचे सांगितले. कंपनीने ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी सांगितले असता, शेतकऱ्यांनी तेही केले. मात्र, आजपर्यंत विमा कंपनीचे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, असेच होत राहिल्यास शासन व शासनकर्ते यांच्यावर विश्वास कसा ठेवावा, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासन स्तरावरून आपण योग्य कारवाई करून विमा कंपन्याना पंचनामे करण्यास भाग पाडावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती ठरावात केली आहे. कृषी मंत्र्यांनी ओला दुष्काळाची परिस्थिती नसल्याचे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आरोपही या वेळी करण्यात आला.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com