Eknath Khadse: दूध संघात प्रशासक मंडळाच्या कार्यकाळातच गैरव्यवहार झाला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दूध संघ निवडणुकीत विरोधकांचा समाचार घेतला.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

जळगाव : जिल्हा (Jalgaon) दूध संघातील बी ग्रेड तूप व बटर चोरीचा प्रकार मुख्य प्रशासक असलेल्या आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासक (Administrator) मंडळाच्या कार्यकाळातच झाला आहे. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्याबाबत संचालक जगदीश बढे यांनी दाखल केलेली याचिका जिल्हा न्यायालयाने प्रथमदर्शनी दाखल करून घेतली आहे. त्याची शुक्रवारी सुनावणी होणार आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Eknath Khadse made aligation on BJP leaders on milk federation issue)

Eknath Khadse
Dhule; संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे भाजपविरोधात आंदोलन

जळगाव येथील श्री. खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हा दूध संघाचे संचालक जगदीश लहू बढे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. संस्थेच्या प्रगतीचा चढता आलेख विरोधकांना सहन होत नसल्याने राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Eknath Khadse
Swarajya; कर्नाटकात घुसून कन्नडीगांना धडा शिकवू!

श्री. खडसे यांनी सांगितले, की आमदार मंगेश चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, की जिल्हा दूध संघातून १८०० किलो बी-ग्रेड तुप व बटर चोरीला गेले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हाही नोंद केला होता. संचालक मंडळ कार्यरत असताना, हा गैरव्यवहार झाल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

मात्र, प्रशासक मंडळाने हा सर्व बनाव केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच संचालक जगदीश लहू बढे यांनी मुख्य प्रशासक, संपूर्ण मंडळ तसेच कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतला नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिल्यानंतर शहर पोलिसांनी केवळ अर्ज दाखल करून पोच दिली होती, असे खडसे म्हणाले.

याप्रकारणी गुन्हा दाखल करावा, यासाठी जगदीश बढे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, की जिल्हा दूध संघात २९ जुलै २०२२ ते ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रशासक मंडळ होते. त्यावेळी संचालक मंडळ कार्यरत नव्हते, कार्यकारी संचालक मनोज लिमये, सी. एम. पाटील हे देखील पदावर कार्यरत नव्हते. या काळात प्रशासक मंडळाने निविदा न काढता अखाद्य तूप व बटर अकोला येथील एका चॉकलेट कंपनीला विक्री केले आहे. त्यामुळे प्रशासक मंडळातील आमदार मंगेश रमेश चव्हाण, आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील, माजी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, अजय एकनाथ भोळे, अमोल चिमणराव पाटील, अरविंद भगवान देशमुख, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक नामदेव कांडेलकर, गजानन पुंडलीक पाटील, अमोल पंडितराव शिंदे, विकास पंडित पाटील, शैलेश सुरेश मोरखेडे, अनंत अशोक अंबीकर, महेंद्र नारायण केदार, सुनील चव्हाण, निखिल सुरेश नेहते यांना सहकार्य करणाऱ्या इतर संशयितांवर भादंवि कलम ३७९, ४०३, ४०६, ४०८, १२० ब, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. न्यायालयाने प्रथमदर्शनी ही याचिका दाखल करून घेतली असून, त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

महिनाभरात गैरव्यवहार केला

आमदार मंगेश चव्हाण आणि प्रशासक मंडळाच्या कार्यकाळात हा गैरव्यवहार झाला आहे. त्यांनीच तूप आणि लोणी खाल्ले आणि संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाल्याचे दाखवून बनाव केला, असा आरोप श्री. खडसे यांनी केला. पोलिसांवर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. केवळ महिनाभरात त्यांनी गैरव्यवहार केला. त्यांना सत्ता दिली, तर ते संपूर्ण दूध संघाचे भविष्यात काय करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com