चिल्लरचा आवाज होतो, नोटांचा नाही, तुम्ही कोण होणार?

नांदगाव येथे शरद युवा संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मार्गदर्शन केले.
चिल्लरचा आवाज होतो, नोटांचा नाही, तुम्ही कोण होणार?
Mehboob Shaikh Latest News, Nashik Latest News in Marathi Sarkarnama

नांदगाव : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कार्यकर्ते जोडावेत. तसे केले तर आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly elections)राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, यात शंका बाळगण्याचे कारण नाही असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी केले. (Mehboob Shaikh Latest News)

Mehboob Shaikh Latest News, Nashik Latest News in Marathi
नरेंद्र मोदींना नको, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा!

माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शरद युवा संवाद यात्रा झाली. त्यावेळी मेहबूब शेख यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Mehboob Shaikh Latest News, Nashik Latest News in Marathi
राज ठाकरेंना विरोध नको, अयोध्येला येऊ द्या!

श्री. शेख म्हणाले, शंभर वर्षे शेळी म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे जगा. तुम्ही किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले, ते लोकांनी नाव घेतले पाहिजे. चिल्लरचा आवाज केला तर तो मोठा असतो. तर नोटांचा आवाज होत नाही. मात्र, किंमत मोठी असते. आपल्या माणसाची किंमत मोठी आहे. आपला माणूस सुशिक्षित आहे. त्यामुळे युवकांनी न घाबरता अंगावर आले तर शिंगावर घेण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेसने करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष श्री. शेख यांनी केले.

माजी आमदार पंकज भुजबळ, संजय पवार, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, हबीब शेख, विनोद शेलार, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, नारायण पवार, राजू लाठे, दत्तू पवार, सचिन जेजुरकर, अशोक पाटील, डॉ. भरत जाधव, किसनराव जगधने, प्रताप गरुड, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, निलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.