Nashik News; नाशिकच्या ‘या‘ प्रकल्पाला आज दिल्लीची मंजुरी?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत परतताच त्यांनी नाशिकच्या या प्रकल्पाला गती दिली होती.
File Photo Of Neo Metro
File Photo Of Neo Metroarkarnama

नाशिक : (NMC) पुढील दोन ते तीन महिन्यात मेट्रो निओच्या (Metro) कामाला सुरवात होईल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाशिकमध्ये (Nashik) केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी दिल्लीतून अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्याचे बोलले जाते. या संदर्भात आज दिल्लीत बैठक होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. (Neo metro project for nashik city may get green signal today)

File Photo Of Neo Metro
Sanjay Raut News; मला 110 दिवस तुरुंगात ठेवले, त्याची परतफेड करीनच!

या बैठकीसाठी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दिल्लीला गेले आहेत. बैठकीत हा प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच प्रकल्पाची किंमत वाढण्यावरदेखील चर्चा होणार आहे.

File Photo Of Neo Metro
Udayanraje News; राजकारणात निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ च्या निवडणूक प्रचारात नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. दत्तक पिता अभियानांतर्गत ५ ऑक्टोबर २०१८ ला नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर शहरात मेट्रोचे सर्वेक्षण करण्याचे काम सिडको, महामेट्रोला देण्यात आले. त्यानुसार महामेट्रोने शहरात सर्वेक्षण केले. नाशिकमध्ये मेट्रो सेवेसाठी आवश्यक ताशी २० हजार प्रवासी क्षमता उपलब्ध नसल्याने मेट्रोऐवजी एलीव्हेटेड टायरबेस मेट्रो चालविण्याची शिफारस महामेट्रोने केली. टायरबेस मेट्रो सर्वेक्षणाचे काम दिल्लीच्या राईटस कंपनीला दिले.

मेट्रो निओच्या प्रकल्पास २९ ऑगस्ट २०१९ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतर केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी २०९२ कोटींची तरतूद करण्यात आली. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण होईल, असे त्या वेळी आश्वासित करण्यात आले होते. परंतु अद्याप प्रकल्पाचा नारळदेखील न फुटल्याने संभ्रमाचे वातावरण होते.

फुटली कोंडी

नाशिकमध्ये पार पडलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाची कोंडी फोडली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून देशात पारंपरिक व कन्व्हर्टेबल असे दोन मेट्रोचे मॉडेल लागू होणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिकच्या मेट्रो निओप्रमाणेच अन्य राज्यांतून प्रस्ताव आले. सर्व प्रस्तावांचा अभ्यास करून देशभरासाठी एकच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे प्रकल्प लांबत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर तातडीने सूत्रे फिरून केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून प्रकल्प सादरीकरणासाठी बैठक बोलाविण्यात आली.

खर्चाचा भार वाढणार

मेट्रो निओसाठी ३१ किलोमीटर लांबीचे दोन एलिव्हेडेट मार्ग तयार केले जाणार आहेत. या मार्गावर २५ मीटर लांबीची २५० प्रवासी क्षमता असलेली जोडबस धावेल, असे त्या वेळी स्पष्टीकरण देण्यात आले होते. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २१००. ६ कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. महाराष्ट्र सरकार, सिडको व महापालिकेचा खर्चाचा वाटा २५५ कोटींचा असणार आहे. केंद्र सरकार ७०७ कोटी रुपये, ११६१ कोटींचे कर्ज यासाठी उभारले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रकल्पाची किंमत वाढणार असल्याने त्यासंदर्भात मुख्यत्वे चर्चा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com