महापौर झाल्यावर एक दिवसही वाया न घालविता शहरासाठी काम केले!

महापौर सतीश कुलकर्णी यांनी शहरासाठी मोठे प्रकल्प आणल्याचा दावा केलामिपूजन
Satish Kulkarni
Satish KulkarniSarkarnama

नाशिक : महापौर (Mayor) झाल्यापासून एक दिवसही वाया न घालवता शहराच्या विकासासाठी कामे केली. गेल्या महिन्यात मोठ्या प्रकल्पांचे भूमीपूजन केले. आय. टी. परिषद घेतली. कोरोनाचे आव्हान असताना शहराच्या (Nashik) विकासाला चालना दिली, असा दावा शहराचे मावळते महापौर सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni) यांनी केला.

Satish Kulkarni
आयुक्तांनी भाडे आकारणीचे पत्र दिले; महापौर सतीश कुलकर्णी यांनी निवासस्थान सोडले!

ते म्हणाले की, कारकिर्दीच्या शेवच्या दिवसांत मात्र प्रशासनाने अपेक्षित सहकार्य केले नाही. महाराष्ट्रातील एकंदरीत राजकीय परिस्थिती ही विकासाभिमुख नाही. दबावतंत्र वापरुन दडपशाही पध्दतीचे कामकाज सुरु असल्याने नाशिक शहरातही यापेक्षा वेगळे होणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी रामायण हे महापौरांचे निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला.

Satish Kulkarni
भाजपच्या नगरसेवकांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडले!

श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, माझ्या ३५ वर्षातील राजकीय कारकीर्दीत अनुभव, नियम व संयम या त्रिसुत्रीय पध्दतीने मी कार्यरत राहीलो. यापुढेही नाशिककर जनतेसाठी मी सदैव तत्पर राहील. मी केलेल्या कामांना जनतेने दिलेला प्रतिसाद, प्रेम, जिव्हाळा हा कायम मला प्रोत्साहीत करेल. त्यासाठी जनतेला मी धन्यवाद देतो.

ते म्हणाले, १३ मार्चला माझा कार्यकाळ संपुष्टात आला. मागील पूर्ण महिना मी मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन व आय टी परिषद यामध्ये अतिशय व्यस्त असल्याने मनपा आयुक्तांना पत्र दिले. शेवटी महापालिकेने काढलेल्या विकास कामे व इतर कामे लिंक करण्यासाठी मला महापौर निवास स्थान दहा- पंधरा दिवस उपलब्ध व्हावे अशी माझी अपेक्षा होती. मात्र तसे होऊ शकले नाही.

महापौरपदाच्या कार्यकाळात कोरोनाची जागतीक लाट होती. परंतू अशाही परिस्थितीत शहरासाठी सक्षमपणे आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यामध्ये एक दिवसही वाया न घालविता सातत्याने काम करून आवश्यक प्रकल्पांसाठी जे जे करता आले तेथे आग्रहपूर्वक व प्रयत्न पूर्वक केले याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे. सगळे सदस्य पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, कर्मचारी यांच्याशी कायमच चांगले संबंध व सलोखा ठेवला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com