पाणी देऊ शकत नाही, त्या भाजप व त्यांच्या महापौरांना काय म्हणावे?

धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याबाबत शिवसेनेचा महापौरांवर पलटवार.
पाणी देऊ शकत नाही, त्या भाजप व त्यांच्या महापौरांना काय म्हणावे?
Pradip Karpe, Mayor DhuleSarkarnama

धुळे : पाणीप्रश्‍नी शिवसेनेने (Shivsena) आंदोलन केल्यानंतर महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) यांनी भारनियमनामुळे (Power cut) पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचे सांगितले. हे हास्यास्पद आहे. ते नागरिकांना पाणीही देऊ शकत नाही, या शब्दात शिवसेनेने भाजपची खिल्ली उडवली.(Mayor`s reason for water scarcity in dhule is ridiculous)

Pradip Karpe, Mayor Dhule
शिवसेनेच्या `धर्मवीर`ची भाजपच्या `काश्मीर फाईल्स`ला टक्कर!

शिवसेना नेते म्हणाले, महापौरांनी या प्रश्नावर तरी गंभीर व्हावे अथवा महावितरण कंपनीवर मोर्चा काढावा, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणून दाखवावा.

वीज भारनियमन असले तरी अत्यावश्‍यक सेवेसाठी एक्स्प्रेस फिडरची शासनाने सोय केली आहे आणि ती व्यवस्था मनपाकडे असल्याचे मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनीच शिवसेनेच्या आंदोलकांना जाहीर कबूल केले आहे. त्यामुळे आपला आरोप हास्यास्पद आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले.

Pradip Karpe, Mayor Dhule
`अहो मिडियाला कळते ते तुम्हाला का कळत नाही`

यासंदर्भात ते म्हणाले, उन्हाळ्यात पाणीटंचाई नको म्हणून लिकेज काढण्याचे काम युद्धपातळीवर केल्याचे सांगत आहात. मात्र, उन्हाळा सुरू होऊन तीन महिने झाले. मे महिन्यात तुम्ही लिकेज काढायला सुरवात केली. येथेही आपण नागरिकांप्रति किती संवेदनशील आहात हे स्पष्ट होते. वातानुकूलित कार्यालयात बसणाऱ्याला उन्हाच्या झळा बसणार नाहीत आणि उन्हाळा आहे की पावसाळा हेही कळणार नाही.

जलवाहिनीच्या गळत्या हा प्रशासनाचा आणि तुमचा आवडता विषय आहे. ज्या पद्धतीने आपण महापौरपदी विराजमान झाला आहात त्यावरून आपल्याकडून जनतेची सेवा झाली पाहिजे असे वाटत नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठ्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही तर लवकरच शिवसेना स्टाइल काय असते हे तुम्हाला दिसेल असा इशाराही शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे व जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित यांनी दिला.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख सतीश महाले, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, संघटक गुलाब माळी, राजेश पटवारी, देवा लोणारी, संजय वाल्हे, समन्वयक भरत मोरे, नितीन शिरसाट, बबन थोरात आदींनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.