पंजाब सरकारच्या निषेधासाठी महापौर प्रदिप कर्पे उतरले रस्त्यावर!

धुळे शहरात पंतप्रधानांच्या सुरक्षेप्रश्‍नी पंजाब सरकारच्या निषेधार्थ महापौर प्रदीप कर्पे यांनी मशाल रॅली काढली.
Mayor pradeep karpe flambeau march.
Mayor pradeep karpe flambeau march.Sarkarnama

धुळे : भाजप (BJP) युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे षडयंत्र रचणाऱ्या काँग्रेस (Congress) पंजाब सरकारचा मशाल यात्रा काढून तीव्र निषेध केला. या विषयामध्ये राजकारण करणाऱ्या पंजाबच्या काँग्रेस सरकारवर कारवाई झाली पाहिजे असी मागणी यावेळी महापौर प्रदिप कर्पे यांनी केली.

Mayor pradeep karpe flambeau march.
कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच, धर्मभास्करला लाजवेल असा ५० कोटींचा घोटाळा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी राहिली. यावेळी त्यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गातच शेतकरी आंदोलन करीत होते. त्यामुळे पंतप्रधाना रस्त्यात थांबावे लागलेव आयोजित केलेल्या सभेला हजेरी न लावताच परत जावे लागले होते. या विषयावर देशभरात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने त्याच्या निषेधार्थ विविध उपक्रम सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे धुळे शहरात मशाल मार्च काढण्यात आला. त्यात महापौर, उपमहापौरांसह मोठ्या संख्येने नगरसेवक सहभागी झाले.

Mayor pradeep karpe flambeau march.
Shocking: कोरोना लसीकरणासाठी रुग्णालय कशाला? झेरॉक्स सेंटरमध्ये या!

यासंदर्भात त्यांनी सांगितले, की पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर असताना त्यांना रस्त्यावर अडविले. अर्थातच ‘सेक्युरिटी ब्रिच’ झाले. पंतप्रधान कोणत्याही राज्यात गेल्यावर एक ठराविक प्रोटोकॉल पाळणे सर्वच राज्य सरकारांना सक्तीचे असते. असे असताना सेक्युरिटी ब्रीच ही एक गंभीर चूक आहे. ती बुद्धीला न पटण्यासारखी आहे. या प्रकारामागे विरोधकांचा हात तर नाही, असा प्रश्न देशातील प्रत्येक नागरिकांपुढे आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या काँग्रेसी पंजाब सरकारचा जाहीर निषेधासाठी मशाल यात्रा काढली.

महापौर प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, नगरसेवक हर्षकुमार रेलन, भगवान देवरे, प्रदीप पानपाटील, नगरसेविका किरण कुलेवार, मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष ॲड. रोहित चांदोडे, राहुल बागूल, सुनील माईणकर, दीपक कोळी, नीलेश गांधलीकर, अजय बागूल, सागर जोशी, जयेश वाहुदे, नीलेश गिळे, पूजा कटके, भूषण गवळी, राहुल मराठे, सुनील खैरे आदींनी या मशाल मोर्चात भाग घेतला.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com